गादेगावच्या रयान तांबोळीला राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक

पंढरपूर (बारामती झटका)
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत लातूर येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये शिवरत्नच्या रयान तांबोळीने सुवर्णपदक मिळवून जानेवारीमध्ये मध्येप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
गादेगाव ता. पंढरपूर, येथील शिवरत्न प्रशालेच्या रयान तांबोळी या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत चमकदार कामगिरी करत गोल्ड मेडल मिळविले आहे. शालेय स्तरावर रयान तांबोळी याने पंढरपूरला प्रथमच गोल्ड मेडल मिळवून दिले आहे. रयान तांबोळी याला तायक्वांदोचे प्रशिक्षक आबा वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी वाटचालीसाठी त्याला आबा वाघमोडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशस्वी वाटचालीबद्दल आरसीसी क्लासेस लातूरचे शिवराज मोटेगावकर, प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे, उद्योगपती बापूराव निकम यांनी अभिनंदन केले. मागील वर्षी रयानने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. याही वर्षी त्याने आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. या यशाबद्दल प्रशालेतील सहशिक्षक राजेंद्र भोसले, नागेश कांबळे, दीपक देशमुख, संतोष पवार, सोमनाथ भुईटे, नियाज मुलाणी, वर्षा मोरे, शीतल बागल, लीना बागल, शीतल मस्के, सीमा रकटे, मसरूद्दीन पटेल, अजय मोरे आदींनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.