माळखांबी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबीराचा शुभारंभ.

माळशिरसचे नायब तहसीलदार अमोल कदम यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन संपन्न
अकलूज (बारामती झटका)
अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर मौजे माळखांबी येथे दि. ७ जानेवारी ते १३ जानेवारी २०२४ या कालावधी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन माळशिरस तालुक्याचे नायब तहसीलदार अमोल कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे अमोल कदम स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, देशाचे भवितव्य युवकांच्या हाती असल्यामुळे विद्यार्थ्यांनी युवावस्थेत स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. जीवनाच्या प्रवासामध्ये कठोर परिश्रमाला पर्याय नाही. वेळ जीवनामध्ये अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे, तिचा सदुपयोग करून युवकांनी यशाचे शिखर गाठावे असे आवाहन केले.
या समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मन, मनगट व मेंदू यांचा समन्वय साधून स्वतःचा विकास करावा. ग्रामस्थांच्या वतीने स्वयंसेवकांचे स्वागत करताना उपसरपंच प्रभाकर गमे-पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिबीराचा आनंद घ्यावा. या श्रमसंस्कार शिबीराला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


यावेळी व्यासपीठावर माळखांबी गावच्या सरपंच सौ. मंगल पुजारी, उपसरपंच प्रभाकर गमे-पाटील, डी.सी.सी बँकेचे वरिष्ठ अधिकारी बलभीम चव्हाण, भगवानराव गमे-पाटील, गोविंदराव माने-देशमुख, शिवाजीराव गमे-पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राज गमे-पाटील, धनाजी साठे, दिपक गमे-पाटील, बाळासाहेब वाघमारे, प्रमोद शेळके-पाटील, माळखांबी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रविंद्रकुमार क्षीरसागर व जिल्हा परिषद शाळेचा सर्व स्टाफ, त्याचबरोबर डॉ. बाळासाहेब मुळीक, कार्यक्रमाधिकारी प्रा. विजयकुमार शिंदे, प्रा. स्मिता पाटील, प्रा. गोरख खराडे-पाटील, तानाजी बावळे आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय मगर यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. बलभीम काकुळे यांनी केले. तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. सज्जन पवार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.