ताज्या बातम्या

‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’, अशी अवस्था कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेची झालेली आहे – जलनायक शिवराज पुकळे

अंधारात नर्सची करंगळी हातामध्ये आल्याने मुलगा झाल्याचा कालवा हॉस्पिटलमध्ये व्हावा, तशी परिस्थिती कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेची झालेली आहे.

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्राचे दमदार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सांगली – कोल्हापूरचे पुराचे पाणी हे कर्नाटकला वळवण्याचा निर्णय झाला, भोगावती नदीमधून पाच किलोमीटरचा बोगदा काढून वेदगंगा नदीमध्ये सोडणे व वेदगंगा नदीमधून ते पाणी कर्नाटक राज्याला देणे. हा म्हणजे पुराचे पाणी वळवण्याचा पहिला टप्पा आहे, या प्रकल्पाचे नाव महाराष्ट्र रेसिलेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम (MRDP) यास केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या कमिटीने एशियन डेव्हलमेंट बँकेची गुंतवणूक स्वीकारण्यास मान्यता दिली असून ते कृष्णा फ्ल्ड डायवर्षण प्रकल्प दुसरा टप्पा याची मान्यता नव्हे.

कृष्णा खोऱ्यामधील कुंभी, कासारे, वारणा, कोयना, कृष्णा या नद्यांचे पाणी कृष्णा फ्लड डायवर्षण योजनेअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सातारा, सोलापूर व मराठवाडा या जिल्ह्यांना देण्याकरता दि. १२/०७/२०२३ रोजी पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार शहाजीबापू पाटील व आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये मान्यता दिली. परंतु, अद्याप या प्रोजेक्टचे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणे याचे काम चालू आहे. व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरा टप्पा पूर्ण करून करेक्ट कार्यक्रम करतील, यासाठी थोडा वेळ बाकी आहे. अर्धवट माणसांनी प्रकल्पाचा अभ्यास न करता दुपारपासून उकळ पांढरे करून घेतले आहे, यांच्या अज्ञानाचे सर्वत्र हसू होत आहे, अशी प्रतिक्रिया निरा-देवधर उर्वरित संघर्ष समितीचे अध्यक्ष जलनायक शिवराज पुकळे यांनी दिलेली आहे.

अंधारात नर्सची करंगळी हातामध्ये आल्याने मुलगा झाल्याचा कालवा हॉस्पिटलमध्ये व्हावा, तशी परिस्थिती कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेची झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button