ताज्या बातम्या

ह. भ. प. श्री. सदानंद उर्फ नंदू दादा कुंभार यांचा 75 वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार…

अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त सार्वजनिक भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम व वारकरी भूषण ह. भ. प. श्री. अनिल महाराज पाटील, बार्शी यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न होणार आहे.

माळशिरस (बारामती झटका)

ह. भ. प. श्री. सदानंद उर्फ नंदू दादा कुंभार यांचा 75 वा अभिष्टचिंतन सोहळा सोमवार दि. 29 जानेवारी 2024 रोजी श्री संत सावता माळी कार्यालय, एसटी स्टँड शेजारी, माळशिरस, जि. सोलापूर, येथे संपन्न होणार आहे.

अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त सार्वजनिक भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम दु. ३ वा. सुरू होणार आहे. सायं ५ वा. सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. सायं. ६ वा. वारकरी भूषण ह. भ. प. श्री. अनिल महाराज पाटील, बार्शी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. सदरच्या अमृत महोत्सव कार्यक्रमास मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे समस्त कुंभार परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

ह. भ. प‌. सदानंद कुंभार यांचे मूळ गाव इस्लामपूर, ता. माळशिरस, हे असून ते सध्या माळशिरस येथे वास्तव्यास आहेत. त्यांना सुवर्णा कुंभार धर्मपत्नी आहेत. आदर्श पती-पत्नी यांनी आपली मुले सुशिक्षित व संस्कारक्षम बनवली. संदीप, सचिन आणि सतीश अशी तीन मुले. त्यापैकी सचिन आणि सतीश पुणे येथे नोकरी करत आहेत. संदीप कुंभार यांनी इस्लामपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन चौथी ते बारावीपर्यंत सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालयात तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे घेऊन त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2011 मध्ये उत्तीर्ण होऊन उपसंचालक बाष्पक के बॉयलर इन्स्पेक्टर मुंबई येथे कार्यरत झालेले होते. त्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये यश संपादन करून ते आता तांत्रिक सल्लागार तथा सचिव केंद्रीय बाष्पक मंडळ नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत. त्यांना सुविद्य पत्नी शुभांगी उत्कृष्ट गृहिणी असून व्यवसाय करीत आहेत. मुलगी सृष्टी सध्या प्रथम वर्षाला डॉक्टर विखे पाटील कॉलेज, अहमदनगर येथे शिकत आहे. मुलगा सुधांशू दहावीमध्ये शिकत आहे‌.

ह. भ. प. श्री. सदानंद उर्फ नंदू दादा कुंभार यांनी परिवारासह माळशिरस पंचक्रोशीत आदर्श व्यक्ती अशी आपली स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. त्यांचा अमृत महोत्सव सोहळा आयोजित केलेला आहे‌. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, यासाठी समस्त कुंभार परिवार, माळशिरस यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे. घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे आवाहन श्री. संदीप सदानंद कुंभार व समस्त कुंभार परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button