ताज्या बातम्याराजकारण

शिवरत्न बंगला, पाटील वाडा सोडून आ. रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील पत्र्याच्या खोलीत रवाना…

स्वर्गातून इंद्र दानशूर कर्णाची कवच कुंडले घेण्याकरता पृथ्वीवर आले होते कोणत्या कारणासाठी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील पत्र्याच्या खोलीत आले.

फोंडशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव माजी खासदार व भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील विजयदादा वास्तव्यास असलेला शिवरत्न बंगला व रणजीतदादा यांच्या आधार कार्डावर अकलूज येथील पाटील वाडा वास्तव्यास असणारे श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील शिवरत्न बंगला शंकरनगर, अकलूज व पाटील वाडा, अकलूज सोडून फोंडशिरस येथील 15 बाय 15 पत्र्याच्या खोलीत वास्तव्यास का आले ?, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. समाजामध्ये स्वर्गातून इंद्र पृथ्वीवर दानशूर कर्ण याची कवच कुंडले घेण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर आलेले होते, याची आख्यायिका आहे. मात्र, भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील कोणत्या कारणासाठी पत्र्याच्या खोलीत आले, याची चर्चा समाज माध्यमावर सुरू आहे.

फोंडशिरस गावचे सरपंच ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांचा फोंडशिरस येथील घर जागेची नोंद करून घेणे बाबतचा अर्ज आलेला आहे. सदरच्या अर्जामध्ये घर क्रमांक 2952 सिटीसर्वे गट नंबर 638 मध्ये सीमा मुकुंद शेंडे यांचे नावे असणारी मिळकत वर्णन 30 बाय 12 पत्रा बांधकाम असून सदर इमारतीमधील उत्तर बाजूची एक खोली लिव्ह अँड लायसन्स करारानुसार भाडेतत्त्वावर घेतलेली आहे. सदर मिळकतीची ग्रामपंचायत दप्तरी भोगवटदार सदरी नोंद करून घेण्याची विनंती केलेली आहे.

सदरच्या करारामध्ये खोलीमध्ये मी कोणत्याही प्रकारचा अवैध अगर बेकायदेशीर व्यवसाय केला नाही. खोलीत मी तारीख 18/01/2024 पासून राहण्यास येणार असून त्याची पाच वर्षाची मुदत संपल्यानंतर जागा तुमचे ताब्यात देईन, अशा अनेक अटींची पूर्तता करून लिव्ह अँड लायसन्स करार करून दिलेला आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा अर्ज व करार केलेला असल्याने फोंडशिरस पंचक्रोशीत उलट सुलट चर्चा सुरू आहे. आमदार पत्र्याच्या खोलीत राहण्यास येणार असल्याने सदर पत्र्याच्या खोलीचे चित्रीकरण बारामती झटका यूट्यूब चॅनल वर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पत्र्याची खोली कशी असेल याची माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्सुकता लागून राहिलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button