ताज्या बातम्याशैक्षणिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांगेरमाळ, मळोली शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मदनसिंह जाधव यांची सलग दुसऱ्यांदा निवड तर, उपाध्यक्षपदी सौ.आशा जाधव


मळोली (बारामती झटका)

आज मळोली ता. माळशिरस येथील भांगेरमाळ वस्ती शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. मदनसिंह जाधव यांची तर उपाध्यक्षपदी सौ. आशा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्रत्येक उपक्रमात अग्रक्रमाने सहभागी असणारे, शाळेच्या अडीअडचणीसाठी कायम धावून येणारे, शाळेसाठी वेळ देणारे, प्रत्येक मुलांच्या अडीअडचणी वैयक्तिक समजावून घेणारे व्यक्तिमत्व, शाळेतील विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमात सहकार्य करणारे अध्यक्ष म्हणून त्यांची फेर निवड केल्याचे पालकांनी सांगितले.

तसेच शाळेमध्ये महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात अग्रभागी असतात म्हणून सौ. आशा दीपक जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड केल्याचे पालकांनी सांगितले.

या निवडीवेळी शाळेचे शिक्षण तज्ञ संजय गुजर, शंकर गुजर, सूर्यकांत जाधव, युवराज जाधव, शामराव भोसले, रामा घाडगे, प्रताप घाडगे, नवनाथ जाधव, रमेश माने, गणेश जाधव, पांडुरंग टकले, शरद घाडगे, दादा घाडगे, महादेव घाडगे, गोरख घाडगे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष काळे सर, सहशिक्षिका सुरेखा पाटोळे, अंगणवाडी सेविका वैशाली घाडगे उपस्थित होत्या.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

8 Comments

  1. Hi there just wanted to give you a quick heads up. The text in your content seem to be running off the screen in Chrome. I’m not sure if this is a formatting issue or something to do with web browser compatibility but I figured I’d post to let you know. The layout look great though! Hope you get the issue fixed soon. Thanks

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button