ताज्या बातम्या

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विधानसभेतील लक्षवेधीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे लक्ष वेधले…

पिलीव येथील श्री महालक्ष्मी यात्रेच्या नियोजनाबाबत समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार…

भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पिलीवच्या श्री महालक्ष्मी यात्रेत भाविक व यात्रेकरू मोकळा श्वास घेणार..

पिलीव (बारामती झटका)

पिलीव ता. माळशिरस येथील श्री महालक्ष्मी देवीच्या १५ दिवस चालणाऱ्या यात्रेत १५ लाख भाविक येतात. मात्र, त्यांना सुविधा मिळत नसल्याने यावर्षीपासून जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा समावेश असलेली समिती गठण करून भाविकांना सुविधा देणार असल्याचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न विचारल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे पिलीव ता. माळशिरस, येथील श्री महालक्ष्मी यात्रेच्या नियोजनाबाबत समन्वय समितीची बैठक गुरुवार दि. 15/02/2024 रोजी सायंकाळी 05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय दूध डेअरी सात रस्ता येथे आयोजित केलेली आहे. सदरच्या बैठकीस लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, सार्वजनिक बांधकाम विभाग, सोलापूर अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अधीक्षक अभियंता, पशुसंवर्धन, उपायुक्त जिल्हा परिषद, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, माळशिरस विभागाचे उपविभागीय अधिकारी, अकलूज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर, माळशिरस तहसीलदार, गटविकास अधिकारी, माळशिरस पोलीस निरीक्षक, माळशिरस तालुका कृषी अधिकारी, माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी, माळशिरस कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, माळशिरस कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, माळशिरस पशु वैद्यकीय अधिकारी, माळशिरस उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद उप अभियंता बांधकाम विभाग, जिल्हा परिषद उप अभियंता महावितरण, वेळापूर ग्रामसेवक, पिलीव श्री महालक्ष्मी देवी यात्रा समिती अध्यक्ष अशा 25 लोकांची यात्रेच्या नियोजनाची बैठक मनीषा कुंभार निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांनी केले आहे. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विधानसभेतील लक्षवेधीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे लक्ष वेधलेले असल्याने श्री महालक्ष्मी देवी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यात्रेत येणारे भाविक व यात्रेकरू मोकळा श्वास घेणार आहेत.

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील बोलेले होते. महालक्ष्मी देवीच्या भाविकभक्तांचा जिव्हाळ्याचा व अडचणीचा प्रश्न सुटणार असल्याने लोकप्रिय दमदार आमदार यांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत भाविकभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले होते.

पिलीव येथील श्री महालक्ष्मी देवस्थान येथे दरवर्षी पौष शुध्द पौर्णिमेला ही यात्रा भरते, ती १५ दिवस चालते. यात्रेला सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही दररोज लाखो भाविक येतात. परंतु, या ठिकाणी मूलभूत सुविधांची वानवा आहे. देवस्थानची २०० एकर जमीन असूनही यातील बहुतांश जमिनीवर आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे अत्यंत कमी जागेत यात्रा पार पडते. भाविकांचे हाल होतात.

यामुळे भविष्यात काळूबाई मंदिरासारखी एखादी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय या यात्रेकरूंना पिण्याचे पाणी, शौचालय यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्या मिळण्याचा त्यांचा हक्क असताना त्यांना त्या मिळणार का ?, यात्रेच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून यात्रेचे योग्य नियोजन करण्याचे आदेश सोलापूर जिल्हा प्रशासनाला देणार का ?, व देवस्थानच्या मालकीच्या २०० एकर जमिनीसंदर्भात महसूल प्रशासनाची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार का ?, असा प्रश्न लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सभागृहात विचारला होता.

त्यास उत्तर देताना राज्याचे महसूल मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डाॅ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व लोक प्रतिनिधींना घेऊन समन्वय समिती गठीत करून त्यांना भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना देण्याचे, तसेच देवस्थानच्या जमीनी संदर्भात माहिती घेऊन अतिक्रमण हटविण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

यात्रेच्या कालावधीत भाविकांची गर्दी होत असल्याने व्यवसायिक व यात्रेकरू यांना जागेची मोठी अडचण भासत आहे. देवीची जागा असून सुद्धा अडचण होत होती. अनेक भाविकांच्या मनामध्ये इच्छा होती, श्री महालक्ष्मीच्या देवीसाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा. अतिक्रमण हटवून मोकळ्या मनाने यात्रा व्हावी. श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भविष्यात भरणार असल्याने भाविकभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button