मुस्लिम युवकाकडून इंटरनेट द्वारा हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल सकल हिंदू समाज, माळशिरस यांच्यावतीने उद्या माळशिरस बंद

माळशिरस (बारामती झटका)
सकल हिंदू समाजात माळशिरस यांच्यावतीने माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब यांना एका मुस्लिम युवकांने इंस्टाग्रामवर समाजात तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट टाकल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याबद्दल सकल हिंदू समाज माळशिरस यांच्यावतीने उद्या दि. २३/०१/२०२४ रोजी माळशिरस शहर संपूर्ण दिवस त बंद ठेवण्यात येणार आहे, असे निवेदन दिले आहे.
माळशिरस येथील अनिकेत काशीद यांच्या मोबाईलच्या इंस्टाग्राम आयडी वर माळशिरस येथीलच त्यांच्या ओळखीचा जाहीद अन्सर इनामदार यांने त्याच्या इंस्टाग्राम आयडी वर बाबरी मशिद चा फोटो व त्या फोटोच्या वरती अरबी भाषेमध्ये मजकूर लिहिला होता. तसेच त्या फोटोच्या खाली इंग्रजीमध्ये sabar jab waqt hamara aayega tab sir dhad se alag kiye jayenge, असा मजकूर लिहिलेला स्टेटस त्याने ठेवला होता. हे अनिकेत काशीद यांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या तेथील लोकांनादेखील दाखवले. अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना होत असताना, संपूर्ण देश हा उत्सव साजरा करत असताना हिंदूंचा द्वेष करणारा इंस्टाग्राम स्टेटस ठेवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाहीद अन्सर इनामदार यांनी केलेला आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या विरुद्ध अनिकेत काशीद यांनी माळशिरस पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

त्यामुळे सकल हिंदू समाज माळशिरस यांच्या वतीने उद्या दि. २३/०१/२०२४ रोजी माळशिरस शहर संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. सदर निवेदनावर मोहन पिसे, निळकंठ पाटील, संजय जगताप, श्रीकांत मगर, निलेश घाडगे, सागर गुरव, अमोल काळे, सचिन राऊत, दिनेश पोरे, अक्षय गुरव, गौरव पंचवाघ, प्रकाश काशीद, प्रा. काशीद, कानिफनाथ शेलार आदींच्या सह्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.