पळसमंडळ गावचे माजी सरपंच भगवान दिनकर करे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

फोंडशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ गावचे माजी सरपंच भगवान दिनकर करे यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. २२ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता ५८ व्या वर्षी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर पळसमंडळ येथे दुपारी ४ वाजता शोकाकुल वातावरणात राहत्या निवासस्थानाशेजारील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस परिसरातील नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम रविवार दि. २५ मार्च २०२४ रोजी सकाळी ७ वाजता होणार आहे.

स्वर्गीय भगवान दिनकर करे यांनी १५ वर्षे पळसमंडळ गावचे सरपंच पदावर काम केलेले आहे. गावच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांच्या दुःखद निधनाने पळसमंडळ पंचक्रोशी व करे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो व करे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.