ताज्या बातम्याराजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निष्ठावान सैनिकांमुळे माझा विजय निश्चित – खा. रणजितसिंह निंबाळकर

करमाळा (बारामती झटका)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात राबवलेल्या विविध योजना व त्यांनी निर्माण केलेली निष्ठावान शिवसैनिकांची फळी यांच्या सहकार्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून एक लाख मतांनी विजयी होणार असा विश्वास, माढा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. आज करमाळा येथे शिवसेनेच्या माढा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे,
जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, कामगार आघाडीचे अध्यक्ष
येडगळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, वैभव मोरे, समाधान दास, ज्योतीताई शिंदे, संजय शीलवंत, दीपक खंडागळे, समीर शेख, संतोष गोरे, अनिल माने, नवनाथ गुंड, अनिल पाटील, सागर कोल्हे, सुरज जम्मा, रोहन बलाक्षे, सतीश सपकाळ, समीर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांचे स्वागत तालुका विधानसभा प्रमुख राहुल कानगुडे यांनी केले. पुढे बोलताना खा. नाईक निंबाळकर म्हणाले की, माझे वडील हिंदुराव निंबाळकर शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले होते. यामुळे माझी शिवसेनेशी नाळ आहे‌.
आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांना मी कधीही अंतर पडू देणार नाही.

यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे म्हणाले की, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना एसटी प्रवास 50 टक्के करून खऱ्या अर्थाने दररोज महिलांना भाऊबीज देत आहेत. आज प्रत्येक माणसाच्या मनात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. यामुळे करमाळा, माढा लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या विचारावर प्रेम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी व शिवसैनिक तन-मन-धनाने कोणतीही अपेक्षा न ठेवता खा. नाईक निंबाळकरांचे काम करणार आहेत. शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने चालणारा पक्ष असून या पक्षात दुसऱ्या कुणाचाही काहीच चालत नाही. या पुढील काळात सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे असे आवाहन केले.

शिवसेनेचे संपर्क नेते संजयजी मशीलकर यांच्या उपस्थितीत लवकरच माढा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचा मेळावा घेण्यात येणार असून या बैठकीत त्या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की,
प्रत्येक शिवसैनिकांनी राज्याच्या व केंद्र शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्याची माहिती करून देण्यासाठी काम करावे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेतून दिला आहे. यामुळे त्यांचा शब्द यशस्वी करण्यासाठी काम करावे, असे आवाहन केले.

या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील प्रमुख शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन प्रत्येक तालुक्याला एक कोअर कमिटी नेमण्याचे व या पुढील काळात या कोअर कमिटीच्या माध्यमातूनच सर्व निर्णय घेण्यात येण्यात असल्याचे कार्यतत्पर पाणीदार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले व या कोअर कमिटीमध्ये शिवसेनेला व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे स्थान देणार असल्याचे सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button