पोलीस मित्र संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी देविदास वाघमोडे पाटील यांची निवड.

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय जनसंपर्कप्रमुख गजानन भगत यांनी निवड केली.
माळशिरस (बारामती झटका)
अखिल भारतीय पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली या संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री संतोष दादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख श्री गजानन भगत यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री सुनील भाऊ पाटील यांनी भांबुर्डी गावचे माजी सरपंच युवा नेते देविदास नारायण वाघमोडे पाटील यांची पोलीस मित्र संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी श्री गजानन भगत श्री सुनीलभाऊ पाटील, कपिल वाघमोडे आप्पासाहेब वाघमोडे आप्पा ढेंबरे रावसाहेब गोरड रामदास कोकरे लक्ष्मण वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

माळशिरस येथील शासकीय विश्राम गृह येथे नूतन माळशिरस तालुका अध्यक्ष श्री देविदास नारायण वाघमोडे पाटील यांना दिलेल्या नियुक्ती पत्र आपली माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तरी आपण आपल्या संघटनेचे महत्त्व ओळखून पोलीस व नागरिकांना मदत कराल आणि संघटनेची प्रतिमा जनसमुदायांमध्ये उज्वल कराल आणि संघटनेचा जनाधार मजबूत होईल अशा प्रकारे कार्य कराल असा विश्वास आहे असे पत्र देऊन आपल्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng