सूर्याच्या ४६ डिग्री तापमानामध्ये सूध्दा माढा लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोहिते पाटील समर्थकांमध्ये गारठा…

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवडणुकीनंतर विजयाची गणिते जुळलेली आहेत…
माळशिरस (बारामती झटका)
देशात व राज्यात बहुचर्चित असलेल्या माढा लोकसभा मतदार संघाच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्यातील रंगतदार व चुरशीच्या निवडणुकीत माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवडणुकीच्या मतदानानंतर विजयाची गणिते दिवसेंदिवस उघड होऊन जुळून येत असल्याने सध्या सूर्याचे आग ओकने सुरू आहे. सूर्याच्या ४६ डिग्री तापमानामध्ये सुद्धा माढा लोकसभेच्या निवडणुकीनंतर मतमोजणी पूर्वीच मोहिते पाटील समर्थकांमध्ये गारठा जाणवत आहे.
माढा लोकसभा मतदार संघात महायुतीने पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च उमेदवारी दिल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील व मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून महाविकास आघाडीची उमेदवारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतलेली होती. त्यातच माळशिरस तालुक्यातील पारंपारिक विरोधी गटाने मोहिते पाटील गटाशी हात मिळवणी केलेली होती.
सुरुवातीस माढा लोकसभा मतदार संघात भाजपला अवघड असणारी निवडणूक राजकीय रणनीती व समीकरणे बदलून भारतीय जनता पक्षाने राजकीय कौशल्य वापरून माढा लोकसभेत महायुतीचे उमेदवार पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाचे गणित बेरजेचे केलेले होते. माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधी गट एकत्र झाल्याने फलटण व मान खटाव मतदार संघात भूमिपुत्र म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना न पडणारी मते सुद्धा आपोआप मिळालेली आहेत. मोहिते पाटील यांनी ज्यांच्या भरवशावर उमेदवारी घेतलेली होती, असे फलटणचा राजे गट व सांगोल्याचा देशमुख गट या तालुक्यांमध्ये वेगळेच चित्र निर्माण झालेले होते. सांगोला तालुक्यात पाण्याचा प्रश्न मिटविलेला असल्याने शेतकरी व सर्वसामान्य मतदार समाधानी होता. फलटण, मान-खटाव नेहमीचे राजकारण वेगळे असे समजून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत.
माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांना पडणारे मताधिक्य फलटण, मान खटाव हे सातारा जिल्ह्यातील मतदार संपवून टाकतील, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. माढा आणि करमाळा शिंदे बंधू यांनी निष्ठेने काम केलेले असल्याने दोन्हीही मतदार संघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य वाढणार आहे. निवडणुकीनंतर सर्व परिस्थिती समोर आलेली असल्याने मोहिते पाटील समर्थक यांच्यामध्ये गारठा जाणवत आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.