मांडकी येथे राजा शिवछत्रपती जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
मांडकी (बारामती झटका)
मांडकी ता. माळशिरस, येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती जन्मोत्सव सोहळा समिती संचलित राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार दि. २१/४/२०२३ रोजी सकाळी ९ वा. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हनुमान मंदिर समोर, मांडकी येथे करण्यात आले आहे.
शनिवार दि. २२/४/२०२३ रोजी सायंकाळी ६ वा. पारंपारिक पद्धतीने शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ८ वाजता भव्य राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे (सोलो) आयोजन देखील करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस ५ हजार रु., द्वितीय क्रमांक ३ हजार रु., तृतीय बक्षीस १५०० रु., चतुर्थ बक्षीस १ हजार रु. असे असणार आहे.

या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९९७५६२६२१५, ९७६४४९७३४७, ७०३८६२५८३८ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng