चि. प्रशांत रुपनवर, कारुंडे आणि चि. सौ. कां. स्वरांजली डोंबाळे, मोरोची यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न

श्री. सुरेश रुपनवर, कारूंडे आणि श्री. अशोक डोंबाळे, मोरोची यांच्या रेशीमगाठी ऋणानुबंधात बांधल्या जाणार
कारुंडे (बारामती झटका)
श्री. सुरेश शंकर रुपनवर रा. कारुंडे, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. प्रशांत आणि श्री. अशोक मारुती डोंबाळे रा. मोरोची, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. स्वरांजली यांचा शाही शुभविवाह सोहळा सोमवार दि. ३/६/२०२४ रोजी सायंकाळी ६.५० मि. या गोरज मुहूर्तावर स्वामी समर्थ मंगल कार्यालय, धर्मपुरी बंगला येथे संपन्न होणार आहे. तरी या शुभविवाह सोहळ्यास आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रुपनवर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
आपणा सर्वांच्या साक्षीने, वाद्यांच्या गजरात, सनईच्या मधुर स्वरात, या पवित्र मंगलक्षणी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने हा सोहळा साजरा व्हावा, म्हणूनच हे आग्रहाचे निमंत्रण रुपनवर परिवार व डोंबाळे परिवार यांच्या वतीने देण्यात आले आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत नजर चुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याची विनंती रुपनवर व डोंबाळे परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.