ताज्या बातम्या

प्रवासी वाहतूक वडाप जीपचा क्लीनर ते यशस्वी उद्योजक जानकर आप्पा यांच्या जीवनाची यशस्वी गाथा…

सर्जेराव शामराव जानकर उर्फ जानकर आप्पा यांच्या एकसष्टीनिमित्त जीवनावर टाकलेला प्रकाशझोत, प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणा जोपासत समाजात प्रतिष्ठा निर्माण केली….

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस येथील अंजूबाई व शामराव गणपत जानकर सर्वसामान्य व शेतकरी दांपत्य. त्यांच्या पोटी सर्जेराव जानकर उर्फ आप्पा यांनी जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणा जोपासत समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण केलेली आहे. अत्यंत हलाखीची, प्रतिकूल व आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सुरुवातीस प्रवासी वाहतूक वडापच्या क्लीनर पासून जीवनाला सुरुवात करून यशस्वी उद्योजक जानकर आप्पा यांच्या जीवनाची यशस्वी गाथा तयार झालेली आहे. सर्जेराव शामराव जानकर उर्फ जानकर आप्पा यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त जीवनावर टाकलेला प्रकाशझोत समाजातील इतरांनी आदर्श घ्यावा असा आहे.

अंजूबाई व शामराव गणपत जानकर सर्वसामान्य व शेतकरी दांपत्य. यांना सर्जेराव, जिजाबा, दशरथ, भरत अशी चार मुले तर फुलाबाई देवकते, काटेवाडी, शारदा राजगे, माळशिरस, सुनंदा भिसे, दुधेभावी अशा तीन मुली. गरीब प्रतिकूल परिस्थितीत या दांपत्यांनी आपल्या मुलांना व मुलींना चांगले संस्कार दिले. त्या संस्कारामधून सर्वच अपत्त्यांनी घराण्याचे नाव उज्वल केलेले आहे.

सर्जेराव शामराव जानकर उर्फ जानकर आप्पा भावंडामध्ये सर्वात मोठे. प्रतिकूल परिस्थितीत आई-वडिलांना साथ द्यावयाची या इराद्याने आप्पा यांना नववी पास होऊन सुद्धा दहावीत प्रतिकूल परिस्थितीमुळे जाता आले नाही. त्यांनी व्यवहारज्ञानापुरते शिक्षण घेऊन जीवनाच्या संघर्षाला सुरुवात केली. शेती व्यवसायाला जोड असावी यासाठी त्यांनी दुसऱ्याच्या प्रवासी वाहतूक वडाप करणाऱ्या जीपवर क्लीनर म्हणून सुरुवात केली. यामध्ये त्यांनी वाहन चालवण्याचे ज्ञान आत्मसात केले. याचा फायदा होवून त्यांना क्लीनर वरून डिझेल, पेट्रोलच्या टँकरवर ड्रायव्हर म्हणून काम करता आले. त्यामधून त्यांना समाजामध्ये असणारे व्यवहारिक ज्ञान ज्ञात झाले.

त्यांनी नर्सरी व्यवसाय सुरू केला. फुलझाडे, फळझाडे, जंगली झाडे असून नर्सरीमध्ये गेल्या 30 वर्षापासून प्रगती केलेली आहे. नर्सरीबरोबर जोड व्यवसाय म्हणून कॉन्ट्रॅक्ट घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीस कॉन्ट्रॅक्टचे रजिस्ट्रेशन अथवा मजूर सोसायटी नव्हती. त्यावेळेस दुसऱ्याच्या नावावर कामे घेण्यास २०१० सालापासून सुरुवात केली. २०२३ साली डांबराचा प्लांट सुरू सुरू केलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेली आहे.

मातोश्री अंजूबाई, वडील शामराव जानकर यांचा आशीर्वाद व खऱ्या अर्थाने मोलाची साथ देणाऱ्या मोरोची येथील सुळ पाटील परिवारातील सुरेखा धर्मपत्नी यांनी जीवनामध्ये सुखदुःखात साथ दिलेली आहे. सौ. सुरेखा व श्री. सर्जेराव जानकर यांना सचिन, स्नेहल अशी दोन मुले व स्वाती एक मुलगी आहे.

आप्पांच्या घरातील तीस-पस्तीस वर्षांपूर्वी मातोश्री अंजूबाई यांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर वडील शामराव यांचा मृत्यू झालेला आहे. सचिन यांना माळशिरस येथील सरगर परिवारातील सरस्वती धर्मपत्नी लाभलेल्या आहेत. त्यांना शिवदत्त, रामेश्वरी, ज्ञानेश्वरी अशी तीन अपत्ये आहेत. स्नेहल यांना माळशिरस येथील पांढरे परिवारातील धनश्री धर्मपत्नी लाभलेल्या आहेत .त्यांना राजेश्वरी व शिवराज अशी दोन अपत्ये आहेत. तर स्वाती यांचा बारामती येथील देवकाते परिवारातील बाजीराव देवकाते यांच्याशी विवाह झालेला असून त्यांना आदित्य व विकी अशी दोन अपत्य आहेत. मुलीचा सुद्धा संसार सुखाचा व समाधानाचा सुरू आहे.

आप्पांचा एकसष्ठी सोहळा शनिवार दि. १/६/२०२४ रोजी अक्षता मंगल कार्यालय, माळशिरस-अकलूज रोड, येथे सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेमध्ये प्रतिकूल परिस्थितीत ज्या मित्र परिवारांनी साथ दिली, त्या मित्र परिवारांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व मित्र परिवार नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन सर्जेराव जानकर उर्फ आप्पा यांच्या मित्र परिवारांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button