फडणवीसांचा नवा विक्रम! शरद पवारांना मागे टाकत मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात तिसऱ्या स्थानी

मुंबई (बारामती झटका)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचे एकूण २,४३० दिवस पूर्ण करत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा टप्पा गाठला आहे. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत फडणवीस आता तिसऱ्या स्थानी पोहोचले असून त्यांनी शरद पवार यांच्या २,४१२ दिवसांच्या कार्यकाळाला मागे टाकले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम हा वसंतराव नाईक यांच्या नावावर असून, त्यानंतर विलासराव देशमुख दुसऱ्या स्थानी आहेत. आता देवेंद्र फडणवीस तिसऱ्या, तर शरद पवार चौथ्या स्थानी आहेत. फडणवीस यांचा विद्यमान कार्यकाळ सुरू असल्याने त्यांच्या नावावरील हा विक्रम आणखी विस्तारत जाणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



