भाजप शहर अध्यक्ष पदाच्या चर्चेवर पूर्णविराम महादेव कावळे यांची पुनश्च अध्यक्षपदी निवड…

अकलूज शहरातील प्रमुख S.I.R. संदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक..
अकलूज (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टी अकलूज शहर अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, या सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलेले होते. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी अकलूज शहर अध्यक्षपदी महादेव कावळे यांच्या नावाची घोषणा केल्याने अकलूज भाजप शहर अध्यक्ष पदाच्या चर्चेला पूर्णविराम झालेला असून पुनश्च महादेवरावजी कावळे यांची अकलूज शहराध्यक्षपदी निवड झालेली आहे.
माळशिरस विधानसभा मतदार संघातील शासकीय विश्रामगृह, अकलूज येथे अकलूज शहरातील प्रमुख भाजप पदाधिकारी, S.I.R. B.L.A.-2 आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

यावेळी S.I.R. प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी, मतदार यादीची अचूकता, B.L.A.-2 यांच्या जबाबदाऱ्या, आगामी निवडणुकीची तयारी तसेच संघटनात्मक आढावा आणि पुढील कार्ययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र मतदाराचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही बैठक पार पडली. यावेळी श्री. प्रकाशबापू पाटील, सोपानकाका नारनवर, सौ ज्योतीदेवी माने पाटील, तालुका संघटक डॉ. निलेश ननवरे, भाजप शहर अध्यक्ष महादेवरावजी कावळे यांच्यासह अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



