शालेय साहित्याचे वाटप करून मुलीचा वाढदिवस साजरा केला…

वाघोली (बारामती झटका)
तांबवे ता. माळशिरस, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षणप्रेमी नागरिक श्री. संभाजी सोपान पवळ यांनी आपली मुलगी आर्वी हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तांबवे ता. माळशिरस, येथील जि. प. शाळेतील सर्व मुलांना वह्या, पेन व पट्टी या शैक्षणिक साहित्याबरोबरच खाऊचे वाटप केले.



विशेष म्हणजे कु. आर्वीचा पहिला वाढदिवस केक ऐवजी कलिंगड कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगी संभाजी पवळ व त्यांच्या पत्नी या दोघांचाही शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरच्या उपक्रमाबद्धल जि. प. शाळा तांबवेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विदयार्थी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.