ताज्या बातम्या

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी खुडूस नगरी सज्ज, रिंगण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली – लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक विनायक ठवरे पाटील.

खुडूस (बारामती झटका)

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अतिशय दिमाखात खुडूस ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने वैष्णवांचा सोहळा म्हणून ओळखला जातो. हा सोहळा खुडूस मध्ये दि. 13/07/2024 रोजी येणार आहे. खडूस नगरी माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाली असल्याचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक विनायक ठवरे पाटील यांनी बारामती झटकाशी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक विनायक ठवरे पाटील यांनी सांगितले की, माऊलींच्या पालखी सोहळ्यातील तालुक्यातील दुसरे रिंगण व पालखी विसावा खुडूस गावाला लाभलेला असल्याने खुडूसकरांचा आनंद गगनात मावत नाही. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पायीवारी पालखी सोहळा निमित्ताने खुडूस ग्रामपंचायतीने रिंगण तळाची स्वच्छता, रिंगण तळ, फणने, रोटर मारणे, स्वागत कमानी उभारणे, बॅरिगेटिंग करणे, स्वागतासाठी बॅनर उभारणे, स्थळदर्शक नकाशा उभारणी, पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत फूटमसाज तसेच मोफत चप्पल दुरुस्ती, विक्स डबी, महिला वारकऱ्यांसाठी स्नानगृह, महिला वारकऱ्यांसाठी विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, आरोग्य कक्ष, पाणीपुरवठा टाकी स्वच्छ करणे, गटार स्वच्छता करणे, संपूर्ण गावामध्ये दिवाबत्ती सोय करणे, गावातील नालासफाई करणे, काटेरी झाडे झुडपे काढणे, गटर पावडर टाकणे, पाणी शुद्धीकरण करणे, फॉगिंग करणे अशी वेगवेगळ्या प्रकारचे कामे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी ग्रामपंचायतीकडून सर्वांच्या सहकार्याने केली जातात.

तसेच रिंगण सोहळ्यासाठी जे शेतकरी रिंगण सोहळ्यासाठी स्वतःची जमीन देतात त्यांचे विशेष कौतुक आणि त्यांचे पूर्वजन्मीचे पुण्य म्हणून त्यांच्या क्षेत्रामध्ये माऊलींचा रिंगण सोहळा संपन्न होतो. ही विशेष आनंद देणारी गोष्ट आहे, असेही लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक विनायक ठवरे पाटील बोलताना म्हणाले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button