केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांची भाजपचे युवा नेते अतुलजी सरतापे यांनी सदिच्छा भेट घेतली…

भाजपचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस सचिनजी शिंदे यांनी माळशिरस विधानसभेचे भाजपचे भावी उमेदवार अतुलजी सरतापे यांची ओळख करून दिली…
दिल्ली (बारामती झटका)
केंद्रीय सहकार व नागरी विमान राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ उर्फ मुरली अण्णा यांची भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाचे चिटणीस माळशिरस तालुक्याचे भाजपचे युवा नेते अतुलजी सरतापे यांनी मुरली अण्णांची सदिच्छा भेट घेऊन सन्मान केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस सचिनजी शिंदे उपस्थित होते. मुरली अण्णांना अतुलजी सरतापे यांची ओळख करून देताना माळशिरस विधानसभेचे भाजपचे भावी उमेदवार अतुलजी सरतापे आहेत, अशी ओळख करून दिल्याने मुरली अण्णा यांनी हस्तांदोलन करून भविष्याच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चाचे चिटणीस अतुलजी सरतापे भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात भरीव काम करीत आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे विश्वासू असल्याची भारतीय जनता पक्षामध्ये चर्चा सुरू आहे.


काही दिवसापूर्वी आमदार विजय मालक देशमुख व सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी अतुलजी सरतापे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिलेली होती. दिल्ली येथे भाजप व संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याने भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माळशिरस विधानसभेच्या उमेदवारीसाठी दावेदार असल्याचे अतुलजी सरतापे यांच्या समर्थकांमधून बोलले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.