तांबवे येथे श्री स्वामी समर्थ महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा महायज्ञ व किर्तन सोहळ्याचे आयोजन.

अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील पायरीचा पूल तांबवे येथे एकमुखी दत्त मंदिर समिती यांच्या वतीने स्वामी समर्थ महाराज मुर्तीची प्राणप्रतिष्ठा, महायज्ञ व किर्तन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
जेथे स्वामींचे नाम, तेथे दैव जागृत असते. महाळुंग व परिसरातील सर्व स्वामी भक्तगण यांना आपल्या हृदयातील श्रद्धा, भक्ती आणि प्रेमाला प्रत्यक्ष रूप देणारा तो अमृतमय क्षण अखेर अवतरत आहे. एकमुखी दत्त मंदिर, तांबवे–पायरी पूल, महाळुंग यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठा, महायज्ञ व कीर्तन सोहळा या दिव्य उत्सवाचे भक्तिभावाने आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.४५ वा. या अमृतलाभ मुहूर्तावर श्रींच्या तेजोमय मूर्तीचे प्राण प्रतिष्ठाचा विधी संपन्न होणार आहेत.
त्या प्रसंगी श्री. मयूरपंत परेश कुलकर्णी यांचे कर्णमधुर आल्हाददायक, अंतर्मनाला भिडणारे भक्तिरसपूर्ण किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्याला स्वामींनी केलेल्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी तसेच सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा व या दिव्य सोहळ्याप्रसंगी आपण सर्व स्वामी भक्तांनी कुटुंबासह उपस्थित राहून या अवतरलेली कृपा क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आयोजकांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



