बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक पदी सुरेशआबा पालवे पाटील यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी भवन येथे सन्मान करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू व खंदे समर्थक सुरेशआबा पालवे पाटील यांचा माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी सन्मान केला…
माळशिरस (बारामती झटका)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू व खंदे समर्थक सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व राष्ट्रवादीचे नेते सुरेशआबा पालवे पाटील यांची पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदार संघाच्या निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे माळशिरस तालुका अध्यक्ष दत्तात्रय ढेकळे यांनी माळशिरस येथील राष्ट्रवादी भवनमध्ये सन्मान केला. यावेळेस वस्ताद नानासाहेब चव्हाण, दीपकराव हुंबे, सागर वायदंडे, सुग्रीव सुरवसे आदी उपस्थित होते.
मांडवे गावचे थोर सुपुत्र सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे विद्यमान सदस्य राष्ट्रवादीचे नेते श्री. सुरेशआबा नारायणराव पालवे पाटील यांची नियुक्ती केलेली आहे.

सुरेशआबा पालवे पाटील यांचे मूळ गाव मांडवे आहे. अजितदादा पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजकारण व राजकारण सुरू आहे. सुरेशआबा पालवे पाटील यांना जिल्हा नियोजन समितीवर असताना निरा उजवा कालवा माळशिरस तालुका कालवा समितीवर घेतलेले होते. सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जिल्हा नियोजन व कालवा समितीवर पहिल्यांदाच निवड केलेले सुरेशआबा पालवे पाटील एकमेव आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू व खंदे समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
बारामती विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देऊन खऱ्या अर्थाने विश्वासू व निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिलेली असल्याने माळशिरस तालुक्यातील सुरेशआबा पालवे पाटील समर्थकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.