ताज्या बातम्या

राष्ट्रपती श्रीम. द्रोपदी मुर्मु यांच्याकडे सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता शरद बाबू मिसाळ यांचा आत्मदहनाचा इशारा…

महावितरणचे सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता शरद बाबू मिसाळ 15 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करणार….

वेळापूर (बारामती झटका)

भारत देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मु महोदया यांना वेळापूर ता. माळशिरस, येथील महावितरणचे सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता शरद बाबू मिसाळ यांनी दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करणार असल्याचे लेखी पत्र देऊन कळविलेले आहे. सदर पत्राच्या लोकप्रतिनिधींना प्रति पाठविलेल्या आहेत. सदर पत्राच्या अनुषंगाने अकलूज उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांनी आत्मदहनापासून परावृत्त व्हावे, असा पत्रव्यवहार केलेला आहे.

महावितरणचे सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता श्री. शरद बाबू मिसाळ यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये
प्रति,
मा. श्रीमती द्रौपदी मुर्मु महोदया,
राष्ट्रपती
भारत सरकार, नवी दिल्ली
महोदया,
विषय :- दि 15 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करणार.

सुमारे 1700 पेक्षा जास्त अर्ज, पत्र, ई-मेल द्वारे न्याय मागितला पण, कसलीही कार्यवाही केली नाही. सन 1976 साली सरकारने भूमिहीन म्हणून मौजे वेळापूर येथे स.नं.48/1ब ही फेरफार 61 ने जमीन संपादित करून फेरफार 62 ने वाटप केली. तेच जमीन आज अखेर आमचे कब्जे वाहिवाटीस आहे, जमीन वाटप करताना तलाठी/मंडलाधिकारी यांनी स.नं.48/1 ब यास ग.नं. 202ड म्हणून फेरफार 62 ने 7/12 ला नोंद केली. परंतु, एकत्रीकरण योजनेनुसार स.न.48/1ब ला ग.नं.203 पडलेला असून ही चूक नजरचुकीने/हस्तदोषाने झाली आहे, ती चूक दुरुस्तीचे आदेश व्हावेत म्हणून महसूल प्रशासनाकडे सुमारे 1700 पेक्षा जास्त अर्ज, पत्र दिली परंतु, कसलीही कार्यवाही नाही.

या दीड दमडीच्या 3 एकर जमिनीच्या किंमतीच्या 500 पट त्या जमिनीत आजपर्यंत खर्च केलेला आहे. घर, गोठा, विहीर, बोअरवेल, जमीन दुरुस्ती इ. कामे केलेली आहेत. या खर्चात किमान 100 एकर जमीन खरेदी करता आली असती. मात्र, या जमिनीच्या चुकीच्या नोंदीचा गैरफायदा घेऊन माझ्या बापाची हत्या केली गेली आणि आजही या चुकीची नोंद दुरुस्त केली जात नाही. केवळ पैसा अन पैसा एवढे ध्येय समोर ठेऊन अधिकारी न्याय देत नाहीत. याचा निषेध म्हणून मी दि. 15 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करणार. माझ्या मृत्यूला महाराष्ट्र सरकार, अकलूज प्रांत, नामदेव टिळेकर, अव्वल कारकून मोमीन, नूतन प्रांत विजया पांगारकर महोदया, मा. कुमार आशीर्वाद साहेब, जिल्हाधिकारी, सोलापूर व मा. सुजाता सौनिक महोदया, मा. राजेश कुमार अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल हेच जबाबदार असतील.
शरद बाबू मिसाळ
सहाय्यक अभियंता (सेवानिवृत्त)
महावितरण, मु. पो. वेळापूर,
ता. माळशिरस, जि. सोलापूर.
मोबाईल 9970816000

प्रत :- सविनय सादर,
मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब
मा. खा. सुशीलकुमार शिंदे साहेब
माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई
मा. खा. संजय राऊत साहेब,
माझ्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यास विनंती असा पत्रव्यवहार केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button