मोरोचीत तंबाखूचा विडा दिला नाही म्हणून एकास मारहाण

नातेपुते (बारामती झटका)
तंबाखूचा विडा दिला नाही म्हणून एकास शिवीगाळ, दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना मोरोची येथे ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सचिन पांडुरंग खिलारे, ऋतिक बाळू जगताप (दोघे रा. मोरोची, ता. माळशिरस) अशी आरोपींची नावे आहेत याबाबत जनार्दन चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उमाजी जाधव हे गावातील मोरजाई मंदिरात बसले होते. तेव्हा ते दोघे तिथे आले. “तू आम्हाला तंबाखू का दिली नाही, तुला जिवंत होणार नाही,” असे म्हणत उमाजी जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच आरोपीने हातातील कुऱ्हाडीचा तुंबा ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी भारतीय २०२३ चे कलम १०९, ११८(२), ११५ (२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.