अपर पोलीस आयुक्त श्री. दत्तात्रय शिंदे यांना राष्ट्रपतींकडून “गुणवत्तापूर्ण सेवा पदक” देवून स्वातंत्र्य दिनी गौरविण्यात येणार…
सोलापूर जिल्ह्यातील भूमीपुत्राने पोलीस प्रशासनाची गुणगौरवाने मान उंचावली…
मुंबई (बारामती झटका)
श्री. दत्तात्रय तुळशीदास शिंदे, भा.पो.से., अपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार, यांना भारतीय स्वातंत्र्य दिनी मा. राष्ट्रपती यांच्याकडून “गुणवत्तापूर्ण सेवा पदक” देऊन गौरविण्यात येणार आहे.
श्री. दत्तात्रय तुळशीदास शिंदे हे सध्या अपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई- विरार, पोलीस आयुक्तालय या पदावर दि.११/०७/२०२४ पासून कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांनी गडचिरोली, गोंदिया, सोलापूर शहर, नवी मुंबई, मुंबई, सिंधुदुर्ग, सांगली, नागपुर, जळगाव, पालघर, ठाणे शहर याठिकाणी विविध पदावर काम केलेले आहे. त्यांचे मूळगाव सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुक्यातील चिंचोली हे आहे.
आज दि. १४/०८/२०२४ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मा. राष्ट्रपतींनी महाराष्ट्र पोलीस दलातील एकुण ३९ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल “राष्ट्रपती पदक” देऊन गौरवले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांचा व श्री. संदीप दिवाण, पोलीस उप महानिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई या दोन वरिष्ठ आय.पी.एस. अधिक-यांचा समावेश आहे.
श्री. दत्तात्रय शिंदे हे ग्रामीण भागातील सर्व सामान्य शेतकरी कुटंबातील असुन त्यांनी एम.एस.सी. (कृषी), जी.डी.सी. अॅन्ड ए., डी.सी.ए., एल.एल.बी. हे शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये विविध पदावर उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
ⅰ) दि. ०२/१२/१९९६ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उप अधीक्षक या पदावर त्यांची निवड झाली. सन १९९७ मध्ये परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक म्हणून गडचिरोली जिल्ह्यात नेमणूकीस होते. सन १९९९-२००१ या कालावधीत उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदीया या पदावर कामकाज पाहिले.
गडचिरोली व गोंदीया येथील सेवाकालावधीमध्ये त्यांनी अत्यंत परिणामकारक नक्षलविरोधी अभियाने उत्कृष्टपणे राबविली. एरिया डॉमिनेशन, अॅम्बुश इत्यादी नक्षलविरोधी अभियाने राबविली. नक्षलग्रस्त भागामध्ये साडेतीन वर्षांसाठी केलेल्या कठीण कर्तव्याकरीता त्यांना महाराष्ट्र शासनाने “विशेष सेवा पदक” देवून गौरविलेले आहे. तसेच या कर्तव्य काळासाठी केंद्र शासनाचे “आंतरीक सुरक्षा पदक” त्यांना प्राप्त आहे. या काळात नक्षलदलाविरुध्द दाखल विविध गंभीर गुन्ह्यांचा टेररिस्ट अॅन्ड डिसरप्टीव्ह अॅक्टीव्हीटस प्रिव्हेंशन अॅक्ट (टाडा/TADA) या कायद्यांतर्गत तपास केला आहे.
नक्षल विरोधी अभियाना दरम्यान नक्षलदलाच्या मल्लेश या सक्रिय नक्षलवाद्यास अटक झाल्यानंतर व उपकमांडर विक्रम याचा शोध घेण्यासाठी महत्वाची भुमिका बजावलेली आहे.
ii) त्यानंतर सन २००१-२००४ या कालावधीत सहायक पोलीस आयुक्त, विभाग-२ व सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, सोलापुर या पदावर त्यांनी कामकाज पाहिले. सोलापुर शहर येथे कार्यरत असतांना सन २००३ मध्ये फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत अचुक गुन्हेगारी गुप्त वार्ता प्राप्त करुन १२६ हातबॉम्ब जप्त करण्यात आले. या दोन गुन्ह्यांचा प्रिव्हेन्शन ऑफ टेरेरीस्ट अॅक्टीव्हीटीज अॅक्ट (पोटा / POTA) कायद्याअंतर्गत तपास करुन गुन्हेगारांविरुध्द दोषारोपपत्र सादर करण्यात आली. याशिवाय दि.११/१०/२००२ रोजी सोलापुर शहरामध्ये उसळलेल्या जातीय दंगलीमध्ये बेकायदेशिर जमावास पांगविण्यासाठी बळाचा परिणामकारक वापर केला. जिवितांचे व सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी वेळप्रसंगी गोळीबार करावा लागला. तसेच शास्त्रीनगर भागात कॉम्बींग ऑपरेशन राबवून सुमारे ५०० घातक शस्त्रास्त्रे जप्त करुन आरोपींना अटक केली. दंगलीमध्ये आरोपींना अटकाव करणे, अटक करणे व त्यानंतर त्यांचेवर न्यायालयीन खटले भरणे या कामगिरींमध्ये महत्वाची भूमिका बजावली.
iii) शहरातील धोकादायक व्यक्तींना महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, औषधी द्रव्ये विषयक गुन्हेगार, हातभट्टीवाले, वाळू तस्कर व धोकादायक व्यक्ती यांच्या घातक कारवायांवर प्रतिबंध अधिनियम (Maharashtra Prevention of Dangerous Activities of slumlords, Drug offenders Bootleggers, Sand smugglers & Dangerous Persons Act (MPDA) कायद्याअंतर्गत स्थानबध्द (Detention) केले.
iv) सन २००४ ते २००६ या कालावधीमध्ये सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई या पदावर कामकाज पाहिले. नवी मुंबई शहरातील संघटीत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे काम पाहिले. तसेच सन २००६ मध्ये घनसोली येथे उसळलेल्या दंगली दरम्यान आरोपींवर परिणामकारक बळाचा वापर करुन दंगल नियंत्रणात आणली. यावेळी गोळीबार करुन जिवीतांचे व सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण केले.
iv) सन २००६ मध्ये पदोन्नतीवर पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त ते पोलीस अधीक्षक/ पोलीस उप आयुक्त या पदावर नेमणूक झाली. सन २००६ ते २००९ या कालावधीत पोलीस उप आयुक्त, (प्रकटीकरण-१), गुन्हे शाखा, मुंबई या पदावर कामकाज पाहिले. येथे कार्यरत असतांना मुंबई उपनगर परिसरात संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाईवर नियंत्रण ठेवले. तसेच त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का/MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई केली. तसेच या कालावधीत त्यांचे अधिनस्त असलेल्या अधिकाऱ्यासोबत संघटीत टोळ्यामधील गुंडांच्या झालेल्या चकमकीत १३ गुंड ठार झाले.
Vi) सन २००९ ते २०१२ या काळात पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा), नवी मुंबई या पदावर कार्यरत असतांना नवी मुंबई आयुक्तालयामध्ये गुन्हे नियंत्रण करणे, बीट मार्शल सिस्टम कार्यरत करणे, अत्याधुनिक नियंत्रण कक्ष उभारणे याबाबत कार्यवाही केली. तसेच संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या विरोधी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का/MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई केली.
Vii) सन २०१४ मध्ये मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी श्री. दत्तात्रय शिंदे यांच्या सलग गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल “मा. पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह” प्रदान करुन त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेचा गौरव केला.
Viii) सन २०१२ ते २०१५ या काळात पोलीस अधीक्षक, फोर्स वन, मुंबई येथे कार्यरत असताना फोर्स वनच्या अभियान क्षमता वाढविण्यासाठी कामकाज पाहिले. दहशतवाद विरोधी अभियान क्षमता वाढविण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दल (NSG) येथे प्रशिक्षण घेतले. आखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा (ALL INDIA POLICE COMANDO COMPETITION) मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचे संघ व्यवस्थापक म्हणून काम केले व महाराष्ट्र पोलीस दलाला उपविजेते (Silver Medal) पद मिळाले. फोर्सवन या विशेष बलामध्ये तीन वर्षाकरीता उत्कृष्ठ सेवा बजावल्याबाबत सन २०१५ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचे “फोर्स वन विशेष सेवा पदक” प्रदान करुन गौरविण्यात आले.
ix) दि.२०/०५/२०१५ ते १०/०६/२०१६ या कालावधीत पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग या पदावर कार्यरत असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्रियाशिल झालेल्या घरफोडी करणाऱ्या परराज्यातील टोळीबाबत तपास करुन बघोली, ता. कुक्षी, जिल्हा धार, राज्य मध्यप्रदेश येथून आरोपींना अटक करण्यात आली. दि.१७/१०/२०१५ पासुन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये “श्रमदानातून स्वच्छता अभियान” राबविण्यात आले. श्रमप्रतिष्ठ वाढविणे व सामाजिक समतेचा प्रसार व्हावा यासाठी सदरचे अभियान सुरु केले होते. या अभियानामध्ये पोलीस मित्र, सागर रक्षक दल व स्थानिक स्वराज्य संस्था यांचे उत्कृष्ट सहकार्य मिळाले. त्यामुळे पोलीस कार्यालय व पोलीस वसाहती शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेले महत्वाचे सागर किनारे स्वच्छ करण्यात आले.
X) दि.१३/०६/२०१६ ते २३/११/२०१७ या कालावधीत पोलीस अधीक्षक, सांगली या पदावर कार्यरत असताना त्यांनी एकुण १२ धोकादायक व्यक्तीस एम.पी.डी.ए. कायद्याखाली स्थानबध्द करण्यामध्ये पुढाकार घेतला होता. त्याच सोबत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का/MCOCA) कायद्याखाली ०४ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करुन २७ गुंडांच्या विरुध्द कारवाई केली होती. संघटीत मटका जुगार हा गुन्हा करणाऱ्या २१ टोळ्यांविरुध्द मुंबई पोलीस कायदा कलम ५५ अन्वये तडीपारीची कारवाई करुन एकुण १९२ मटका गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार केले.
उत्सवाचे काळात ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी डॉल्बीच्या विरोधी समाज प्रबोधन करुन कायदेशिर कारवाई केली. “डॉल्बीमुक्तीतुन जलयुक्तकडे” ही योजना प्रभावीपणे राबवून उत्सव मंडळांनी दिलेल्या लोक सहभागातून मिरज तालुक्यामध्ये “सुखकर्ता” व “विघ्नहर्ता” या बंधाऱ्यांचे बांधकाम केले.
xi) दि.०४/१२/२०१७ ते २८/०७/२०१८ पर्यंत समादेशक, राज्य राखीव बल गट क्र.४ नागपुर येथे कार्यरत असतांना “राज्य आपत्ती प्रतिसाद दल” (State Disaster Response Force, SDRF) नागपुर या नविन दलाच्या उभारणीचे काम केले. या दलासाठी आवश्यक उपकरणे खरेदी व प्रशिक्षणावर भर देवून कोणत्याही आपत्तीला समक्षपणे प्रतिसाद देण्याकरीता या दलाची क्षमता निर्माण केली.
xii) दि.०३/०८/२०१८ ते २८/०२/२०१९ या कालावधीत पोलीस अधीक्षक जळगांव या पदावर कामकाज पाहिले. जळगांव जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी मोहिम राबविली. भुसावळ शहरामध्ये अतिक्रमण विरोधी मोहिम राबवून ६ चौ. कि.मी. रेल्वे परिसरातील सुमारे ५००० अतिक्रमणे कोणताही अनुचित प्रकार घडू न देता काढली. जळगांव शहरातील अतिक्रमण निर्मूलन केले.
xiii) दि.०८/०३/२०१९ ते २३/०५/२०२० या कालावधीत महावितरण विभागात कार्यकारी संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी या पदावर परिणामकारक कामगिरी केली.
xiv) दि.२३/०५/२०२० ते ०९/०६/२०२२ या कालावधीत पोलीस अधीक्षक, पालघर या पदावर काम करताना ४ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का/MCOCA) कायद्याअंतर्गत कारवाई केली. साधु हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पोलीस- जनता संपर्क वाढवून पोलीस दलाबाबत विश्वास निर्माण केला.
XV) दि.१०/०६/२०२२ ते १०/०७/२०२४ या कालावधीत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, ठाणे शहर या पदावर कार्यरत असतांना त्यांनी एकुण २० धोकादायक व्यक्तींना ए.पी.डी.ए. कायद्याखाली स्थानबध्द करण्यामध्ये पुढाकार घेतला आहे. त्याच सोबत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का/MCOCA) कायद्याखालील कलमांचा ४३ गुन्ह्यांमध्ये अंतर्भाव करण्याची पुर्वमंजुरी दिली. या गुन्ह्यांपैकी एकुण ३४ गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आले असुन त्यामध्ये एकुण २५ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील १३१ संघटीत गुन्हेगारांविरुध्द कारवाई केली आहे. त्यामुळे चैन स्नॅचिंग या गंभीर गुन्हे करणाऱ्या संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर संपुर्ण नियंत्रण मिळवता आले.
xvi) अशा प्रकारे त्यांनी पोलीस विभागात विविध क्षेत्रामध्ये व शाखामध्ये प्रभावी काम केले आहे. नक्षलग्रस्त भागामध्ये नक्षलविरोधी अभियाने राबवणे, मुंबई शहरामधील गुन्हे शाखेत काम करुन मुंबईतील संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांवर अंकुश ठेवणे व फोर्स वन सारख्या विशेष बलामध्ये प्रशिक्षण घेऊन शहरी दहशतवाद विरोधी अभियाने (अर्बन काऊंटर टेरेरिझम ऑपरेशन) या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, सांगली, जळगांव, पालघर व अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण ठाणे शहर या पदावर कार्यरत असतांना एम.पी.डी.ए. व मोक्का/MCOCA या विशेष कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. मटका व संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर तडीपारीची कारवाई खंबीरपणे केलेली आहे. तसेच ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी “डॉल्बीमुक्तीतुन जलयुक्तकडे” महिला सुरक्षेकरीता “निर्भया सायकल रॅली” आयोजन, महिला सुरक्षेकरीता “निर्भया पथकाची निर्मीती” ह्या नाविन्यपूर्ण व लोकसहभागाच्या योजना राबविल्या आहेत. पोलीस दलासाठी आव्हानात्मक असलेल्या सर्व विभागामध्ये व विशेष दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय स्वातंत्र्यांच्या ७७ व्या वर्धापन दिना निमित्त, गृह मंत्रालय, भारत सरकार यांचेकडील आदेश क्र.एफ. नंबर. ११०१९/०८/२०२४ पीएमए दिनांक १४/०८/२०२४ अन्वये, श्री. दत्तात्रय शिंदे यांना मा. राष्ट्रपतीनी “गुणवत्तापूर्ण सेवा पदक” देवून गौरवले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा
I have been surfing online more than 3 hours today yet I never found any interesting article like yours It is pretty worth enough for me In my opinion if all web owners and bloggers made good content as you did the web will be much more useful than ever before
Your blog is a constant source of inspiration for me. Your passion for your subject matter is palpable, and it’s clear that you pour your heart and soul into every post. Keep up the incredible work!