अभाविप उमरगा नवनिर्वाचित शहर मंत्री म्हणून समर्थ कुंभार यांची निवड करण्यात आली व उर्वरित कार्यकारणी घोषित

उमरगा (बारामती झटका)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उमरगा शाखेच्या वतीने छात्रसत्ता विद्यार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभाविप उमरगा शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून लातूर विभाग संयोजक श्री. यश आरिकर उपस्थित होते.

निर्वाचन अधिकारी श्री गणेश कटके यांनी शहर मंत्री म्हणून समर्थ कुंभार यांची घोषणा करण्यात आली. तसेच उर्वरित कार्यकारिणीची घोषणा शहर मंत्री यांनी केली. प्रास्ताविक तालुका संयोजक यांनी मांडले,यावेळी लातूर विभाग संघटन मंत्री श्री. महेश भवर, धाराशिव जिल्हा संयोजक श्री. राजेश कवडे, धाराशिव दक्षिण भाग संयोजक श्री. पंकज बेळकोने, उमरगा तालुका संयोजक श्री. धनेश जाधव तसेच धाराशिव शहर विद्यार्थी विस्तार श्री. पवन नरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शहर सहमंत्री म्हणून नामदेव शिंदे व ऋतुजा शिंदे, शहर कार्यालय मंत्री शेखर सूर्यवंशी, कार्यालय सहमंत्री स्नेह महामुनी, कोष प्रमुख शुभम कांबळे, सोशल मीडिया संयोजक राजकुमार कांबळे व सहसंयोजक तुकाराम शिंदे, स्टुडंट फॉर डेव्हलपमेंट संयोजक हिंदवी भुरे व सहसंयोजक ओंकार सुरवसे, स्टुडंट फॉर सेवा संयोजक प्रणव कुलकर्णी, राष्ट्रीय कलामंच संयोजक प्रतीक्षा राठोड व सहसंयोजक स्वाती शिंदे, खेलो भारत संयोजक व्यंकट जाधव व सहसंयोजक गुंडप्पा माशाळे, फार्मा व्हिजन संयोजक सृष्टी ख्याडे तसेच शहर कार्यकारिणी सदस्य अभिषेक मिसाळ यांची निवड करण्यात आली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



