कचरेवाडी येथील तुळजाभवानी देवस्थान तीर्थक्षेत्राचा ५ कोटींच्या विकासकामांचा भूमिपूजन उद्घाटन समारंभ

लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते आणि समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई सातपुते या उभय पतीपत्नीच्या शुभहस्ते तर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार संपन्न…
कचरेवाडी (बारामती झटका)
कचरेवाडी, ता. माळशिरस येथील श्री तुळजाभवानी देवस्थान कचरेवाडी या तीर्थक्षेत्राच्या पाच कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सिद्धनाथ मंदिर सभामंडप, सामाजिक न्याय विभाग सभामंडप उद्घाटन समारंभ व ग्रामपंचायत कचरेवाडी पंधरावा वित्त आयोगातून गावातील सर्व अनुसूचित महिलांना साडी वाटप कार्यक्रम माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते व सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई राम सातपुते या उभयपती पत्नींच्या शुभहस्ते रविवार दि. ०९/०८/२०२६ रोजी सकाळी १० वा. कचरेवाडी ग्रामपंचायत येथे होणार आहे.

यावेळी बाबाराजे देशमुख, प्रकाशबापू पाटील, आप्पासाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव, अकलूजचे मंडलाध्यक्ष सुजयसिंह माने पाटील, नातेपुते मंडलाध्यक्ष संजय देशमुख, माळशिरस मंडलाध्यक्ष नितीन मोहिते, भांबुर्डीचे माजी सरपंच देविदास पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.

तरी सर्व कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



