करमाळ्याची जनता आ. संजयमामा शिंदे यांच्या पाठीशी खंबीर;

विरोधकांसारखी गोलिगत धोका देऊन बुक्कीत टेंगुलची भाषा संयमी संजयमामांनी कधीही वापरली नाही.
करमाळा (बारामती झटका)
विधानसभेची निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसतशी आमदार संजयमामा शिंदे यांच्या विरोधकांची व काही शिवराळ कार्यकर्त्यांची भाषा विकासाच्या गोष्टी मांडण्याऐवजी वेगळी होत आहे. काल परवाच्या काही बातम्या पाहुन तर हे लोक राजकारणासाठी सपशेल खोटारडेपणाने आपल्याच काही कार्यकर्त्यांना कॅमेऱ्यासमोर आणुन आमदार मामांच्याविरुद्ध बोलायला भाग पाडत आहेत, हे दिसुन आले आहे. आणि गेल्या पाच वर्षाचा आणि चालु पाच वर्षाचा हिशोब मांडु लागले आहेत.
या खोट्या अपप्रचारामुळे आमदार संजयमामांची मते मुळीच कमी होणार नाहीत, उलट वाढच असेल हे या मंडळींनी लक्षात घ्यावे. गेल्या पाच वर्षात जर एवढी विकासकामे केली होती म्हणुन डांगोरा पिटणाऱ्या बहादरांना आमचा सवाल आहे की, मग ती कामे गेली कुठं ? रस्त्याच्या, पाण्याच्या, आरोग्याच्या, वीजेच्या समस्या का प्रलंबित ठेवल्या. आपल्या काळात झालेल्या कामांमधे किती मलिदा लाटला, हे सुद्धा मांडायला पाहिजे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.