अकलुज येथे महात्मा बसवेश्वर बहुउदेशीय संस्थेच्यावतीने गरभा-दांडिया स्पर्धा संपन्न.
अकलूज (बारामती झटका)
अकलुज येथे महात्मा बसवेश्वर बहुउदेशीय संस्थेच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमीत्त गरभा-दांडिया स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धा महादेव देवालय, नष्टे होंडा, शिव-लिला एक्झिक्युटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेचे उद्घाटन देवीच्या प्रतिमेचे पूजन लिंगायत समाज महिला अध्यक्षा शीला जठार, उपाध्यक्षा श्वेता गुळवे यांनी केले तर दीप-प्रज्वलन भजनी मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला गुळवे, शिल्पा नष्टे, पुष्पलता गुळवे, वंदना शेटे यांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी वीरशैव लिंगायत महिला मंडळ यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढविली.
या गरभा व दांडिया नृत्य स्पर्धेतील विजेती तेजश्री कथले, बेस्ट दांडिया – निशा कुरूडकर, बेस्ट एक्सप्रेशन – डॉ. शितल शेटे, बेस्ट गरभा – शिला जठार, बेस्ट ड्रेपरी – ज्योती नरुळे, बेस्ट एनर्जेटिक परफॉर्मन्स – शकुंतला गुळवे यांचा प्रशिस्तीपत्रक व ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून रुनाल व्होरा व नेहा फडे यांनी जबाबदारी पार पाडली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजया गुळवे, विद्या शेटे, अंजली गुळवे, संजना शेटे, ऋतुजा आर्वे, प्राजक्ता जठार, तेजश्री कथले, शिल्पा जठार, अरुंधती गुळवे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पृथांजली शेटे व सारिका गुळवे यांनी केले. यावेळी सर्व लिंगायत महिला व महात्मा बसवेश्वर बहुउदेशीय संस्था सदस्या व वीरशैव लिंगायत महिला मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Sugar defender reviews : sugar defender reviews