सातारा जिल्ह्यात वक्तृत्व स्पर्धेत राजनंदिनी पडर प्रथम

सातारा (बारामती झटका)
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे आपल्या प्राथमिक शिक्षणाची सुरूवात केली. त्या प्रित्यर्थ महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे दरवर्षी ७ नोव्हेंबर हा दिवस “विद्यार्थी दिवस“ म्हणून साजरा केला जातो. सदर दिवसाचे औचित्य साधून भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उदात्त हेतुने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सातारा जिल्हा परिषद व श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा, जावली येथील इ. ३ रीची विद्यार्थिनी कु. राजनंदिनी विठ्ठल पडर हिने नुकत्याच श्रीमंत छत्रपती हायस्कूल, सातारा येथे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

युगप्रवर्तक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर बोलताना अत्यंत ओघवत्या शैलीत मनोगत व्यक्त करत तिने अत्यंत कमी वयात हे यश संपादन केले आहे. त्याबद्दल जिल्हा परिषद शाळा जावलीचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, जावली केंद्रातील सर्व शिक्षक व जावली ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.