अखेर अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांना शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत गटाचा पाठिंबा

माढा (बारामती झटका)
माढा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गटाचे) सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भैरवनाथ शुगर सहकारी साखर कारखाना, आलेगाव येथे आमदार बबनराव शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी माढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

गेल्या आठवड्यात सावंत परिवाराचा मेळावा वाकाव मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना शिवाजी सावंत यांनी सांगितले की, महायुतीने तिकीट वाटप करताना आम्हाला विचारता घेतले नाही त्यामुळे त्यांची महायुतीवर नाराजी होती. अपक्ष उमेदवार रणजीत बबनराव शिंदे यांना त्यांनी आज पाठिंबा जाहीर दिला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.