सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे नातू आ. रणजीतसिंह मोहिते पाटील व युवा नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्यातील फरक…

भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना राजीनामा मागून सुद्धा पदाला चिटकून बसलेली आहे तर युवा नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना राजीनामा न मागता स्वाभिमानाने राजीनामा दिला…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पश्चात उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी राजकारण करीत असताना स्वाभिमानाने राजकारण केलेले आहे सहकार महर्षी यांची तिसरी पिढी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे सध्या राजकारण करीत आहेत.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत रणजीतसिंह मोहिते पाटील यांची भूमिका भारतीय जनता पक्षला शंकास्पद वाटत आहे लोकसभेच्या वेळी सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस अकलूजला आलेले होते सदरच्या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. विधानसभेच्या निवडणुकीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी अकलूज येथे जाहीर सभेसाठी आलेले होते त्यावेळेस आमदार रणजितसिंह मोहिते पाटील स्टेजवर उपस्थित नव्हे तर त्यांचे स्वागत सुद्धा केलेले नव्हते उलट त्यांचे चिरंजीव व परिवारातील सदस्य गळ्यामध्ये तुतारीचे मफलर घालून प्रचार करीत होते कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकावत होते भाजपच्या सरकारने श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर या कारखान्याला 113 कोटी रुपये दिलेले होते ते पैसे विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारास पाडण्यासाठी वापरलेले होते असा आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत तालुका अध्यक्ष एडवोकेट शरद मदने यांच्यासह भाजपच्या तालुक्यातील राज्य जिल्हा व तालुका पदाधिकारी करीत असताना बुथवर काम करणारे बूथ एजंट सुद्धा जाहीरपणे बोलत आहेत अनेक वेळा प्रचारामध्ये जनाची नाही मनाची तरी असावे किंवा लाज असेल तर राजीनामा द्यावा अशी विधाने अनेक वेळा जाहीर सभांमधून प्रसार माध्यमांमध्ये ऐकावयास मिळत आहेत तरीसुद्धा भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांना राजीनामा मागून सुद्धा पदाला चिटकून बसलेले आहेत.
युवा नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असताना देशाचे केंद्रीय मंत्री व राज्यपाल राहिलेले सुशीलकुमार जी शिंदे व आमदार व सध्या खासदार असणाऱ्या प्रणिती ताई शिंदे यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे कार्यकर्त्यांचे जर नुकसान होणार असेल तर काँग्रेस पक्षाला नाही तर शिंदे शाही ला कंटाळून राजीनामा देण्याचे धाडस केलेले आहे यापूर्वी माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला होता त्यावेळेस कारण होतं शेतकऱ्यांना जर कर्ज मिळत नसेल तर आपण संचालक राहण्यामध्ये अर्थ नाही यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला होता खऱ्या अर्थाने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या विचाराने राजकारण लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी केलेले होते तोच आदर्श डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन खऱ्या अर्थाने आजोबा आणि वडिलांची विचारधारा जोपासलेली आहे तर रणजीत सिंह मोहिते पाटील यांना राजीनामा मागून सुद्धा पदाला चिटकून बसलेले आहेत. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे नातू आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व युवा नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्यामधील फरकाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे
युवा नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासू व खंदे समर्थक माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष सतीश नाना पालकर अकलूज शहराध्यक्ष नवनाथ भाऊ साठे युवक उपाध्यक्ष मयूर माने युवा नेते कैलास जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता जाताना डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचा राजीनामा हेलिकॉप्टरने गेलेला आहे सहा पाने राजीनामा दिलेला आहे सदरच्या राजीनामा पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे.
काँगेसचे आदरणीय नेते खा. राहुलजी गांधी आणि काँग्रेसशी प्रेरीत होऊन मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकीकडे पक्षातील अनेक नेतेमंडळी काँग्रेस पक्ष सोडुन भाजप पक्षात जात असतानाही मी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन प्रामाणिकपणे पक्ष बांधणी केली. मी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदाची सुत्र सन २०२१ मध्ये स्विकारले.
काँग्रेस ही फक्त अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व सोलापूर शहर पुर्ती मर्यादीत राहीली होती. बाकीच्या तालुक्यात काँग्रेस अतिशय कमकुवत व नगन्य झाली होती. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाची अध्यक्ष पदाची धुरा तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्विकारली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष बांधणीचे काम प्रामाणिकपणे केले.
काँग्रेस पक्ष वाढीसाठी सोलापूर जिल्ह्यात कार्यकर्ता जनसंपर्क दौरा काढुन सलग दोन महिने खेडोपाडी, वाड्या-वस्त्यावर जाऊन काँग्रेसचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविले. या दौऱ्यामध्ये ज्यागावी दौरा संपेल त्याच गावी मुक्काम करुन सकाळी दुसऱ्या गावी दौरा असे सलग दोन महिने घरदार सोडुन पक्ष बांधणी केली. या पक्ष बांधणीला वेळ देत असताना स्वतःच्या प्रपंचाकडे दुर्लक्ष केले. या मागे एकच उद्देश होता की, सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस वाढावी हाच एकमेव ध्यास मनाशी बाळगुन आम्ही काम करीत होतो. हे करत असताना प्रदेश कार्यालयाकडुन येणारा प्रत्येक कार्यक्रम जिल्ह्यामध्ये व प्रत्येक ब्लॉकमध्ये राबविला. विविध प्रश्नावर मोर्चे, आंदोलने केली. प्रदेश कार्यालयाकडुन आलेल्या सुचनेप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जवळ जवळ ९०% बुथ यंत्रणा आम्ही पुर्ण केली.
देशाचे नेते मा. खा. राहुलजी गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये सुध्दा संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातुन १०० बसमधुन कार्यकर्ते घेऊन सहभागी झालो होतो. प्रदेश कार्यालयाकडुन आलेल्या सुचनेप्रमाणे डिजीटल सभासद नोंदणी मोहिम संपुर्ण सोलापूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली. यामध्ये संपुर्ण महाराष्ट्रातुन ९ व्या क्रमांकाची सुमारे ९५,०९० इतकी सभासद नोंदणी केली आहे. रायपुर अधिवेशमध्ये झालेल्या ठरावाप्रमाणे अल्पसंख्यांक, युवक, महिला यांना जिल्हा व तालुका कार्यकारणीमध्ये ठरावाप्रमाणे संधी देण्याचे काम केले आहे. तेव्हासुध्दा जिल्ह्यातुन विरोध करण्याचे काम काही प्रस्थापीत मंडळी यांनी केले होते, त्यावेळी पक्षाच्या धोरणाप्रमाणे काम करीत असताना जिल्हाध्यक्ष म्हणुन फार त्रास सहन करावा लागला. परंतु, आदरणीय आपले सहकार्याने व मार्गदर्शाखाली ध्येय धोरणाप्रमाणे पक्षाचे काम चालु ठेऊ शकलो.
दिल्ली येथे झालेल्या महागाई पर हल्लाबोल या महारॅलीत हजारो कार्यकत्यांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये महागाई विरोधी आंदोलन, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन, पाणी प्रश्नासाठी आंदोलन, संविधान बचाव आंदोलन, बेरोजगार विरोधी आंदोलन व केंद्र सरकारच्या विरोधातील विविध प्रश्नावर आंदोलने केली आहेत. प्रत्येक तालुक्यात व जिल्हा स्तरावर आझादी गौरव यात्रा संपुर्ण सोलापूर जिल्ह्यात यशस्वीपणे काढली. हे कार्यक्रम राबवीत असताना ग्रामीण भागामध्ये अतिशय प्रभावीपणे काँग्रेसचे काम उभा करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. आणि याचाच परीणाम म्हणुन सोलापूर लोकसभेमध्ये यश मिळाले. सतत १० वर्षे मा. श्री. सुशिलकुमार शिंदे साहेब यांचा दारुण पराभव झालेला होता त्या मतदार संघात मा. खा. प्रणितीताई शिंदे यांना सोलापूर लोकसभेमध्ये ग्रामीण भागातुन मिळालेल्या मताधिक्य यांनी विजयी केले आहे. या सोलापूर लोकसभा मतदार संघामध्ये अक्कलकोट मायनस, शहर उत्तर मायनस, शहरामध्ये ज्या मतदार संघातुन प्रणितीताई शिंदे ३ वेळा आमदार झाल्या त्या मतदारसंघात फक्त ७७९ लिड मिळाले. सोलापूर लोकसभा निवडणुकीत शहर मध्य मतदार संघाचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना सोलापूर शहर अध्यक्ष असलेले चेतन नरुटे यांचे वार्डात मायनस असतानाही विधानसभा निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी दिली व त्यांचे डिपॉजीट जप्त झाले आहे. दुसरीकडे ग्रामीण सोलापूर मधील पंढरपुर-मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर या तालुक्यामध्ये सुमारे ६६ हजाराचे लिड मिळाल्यामुळेच प्रणिताताई शिंदे सोलापूर लोकसभेला विजयी झाले आहेत.
राजस्थान येथील पक्षाचे अधिवेशनात ठराव झालेप्रमाणे जो पक्ष संघटनेमध्ये काम करणार, योगदान देणार त्यांना उमेदवारी देणार असे ठरले होते. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने अनेक तरुण मंडळी पक्षामध्ये तन-मन-धन देऊन झोकुन पक्षासाठी काम करीत होते.
लोकसभा निवडणुकीवेळी पक्षाने जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांना विश्वासात घेतले होते. आम्ही सोलापूर लोकसभेसाठी प्रणितीताई शिंदे यांचे नाव सुचविले. काँग्रेसचे प्रत्येक पदाधिकारी यांनी प्रामाणिकपणे प्रणितीताई शिंदे यांचे काम करुन निवडुन आणण्याचे काम केले आहे.
पण विधानसभा निवडणुकीवेळेस उमेदवारी देताना जिल्हाध्यक्ष म्हणून मला कोठेही विश्वासात घेतले नाही. ज्या सोलापूर लोकसभेमध्ये ३ जागा व माढा लोकसभेमधील सोलापूर जिल्ह्यातील ४ जागेमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. सोलापूर लोकसभेमध्ये ज्या जागेवर काँग्रेसला लिड मिळाले होते, त्या जागा न घेता ज्या ठिकाणी काँग्रेसला कमी मतदान झाले त्या जागा लढविण्यात आल्या.
आज पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघामध्ये काँग्रेसचे सभासदही नसलेले भगीरथ भालके यांची काँगेस पक्षाकडे अधिकृत मागणी नसतानाही त्यांना तिकीट देण्यात आले ? मग कोणाच्या सांगण्यावरुन हे तिकीट देण्यात आले. पंढरपुर-मंगळवेढा या भागामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय का झाला ? भगीरथ भालके यांनी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. भारत जोडो आंदोलन असो किंवा इतर आंदोलने असो. काँग्रेसप्रणीत केलेले कोणतेही अभियानामध्ये सहभाग नसताना यांना कोणत्या कामाचे बक्षीस म्हणून हे तिकीट देण्यात आले.
दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रसचे अनेक कार्यकर्ते, नेते विधानसभा लढविण्यासाठी काँग्रेसकडुन इच्छुक होते. यामध्ये मी सुध्दा दक्षिण सोलापूर मधुन लढविण्यासाठी इच्छुक होतो. आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेला जाहीर झालेनंतर काँग्रेस पक्षाने ही जागा सोडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. मल्लीकार्जुन खर्गेजी, देशाचे नेते मा. श्री. राहुलजी गांधी व प्रदेशाध्यक्ष आपण यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे आघाडीचे काम प्रामाणिकपणे करा, हा आदेश व प्रदेश कमिटीकडील पत्र जा.क्र.७८९/२४ दि.०५.११.२०२४ अन्वये आम्ही आघाडीचे शिवसेना (उबाठा) चे अधिकृत उमेदवार श्री. अमर रतिकांत पाटील यांचे काम सुध्दा केले. पण काँग्रेस पक्षाचा आदेश डावलुन जेष्ठ नेते मा. श्री. सुशिलकुमार शिंदे साहेब, खा. मा. प्रणितीताई शिंदे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष हरीष पाटील व जिल्हा वरीष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी अपक्ष उमेदवार श्री. धर्मराज काडादी यांचे काम केले.
आम्ही सलग ४ वर्षे काँग्रेसचे काम केले. हे काम करीत असताना तत्कालीन भाजप पक्षातील नेत्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर खोट्या केसेस केल्या अनेक कार्यकर्त्यांवर तडीपार ऑर्डर काढल्या, याच मंडळीनी नंतर शरद पवार राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश केला. त्यांनाच राष्ट्रवादीने खासदारकीचे तिकिटे दिले. ज्यांनी आमच्यावर अन्याय केला, त्यांच्याच प्रचार करण्याची नामुष्की आमच्यावर आली. “जिच्यासाठी चुल वेगळी मांडली तिच सासु वाटणीला आली.”
तसेच तत्कालीन भाजप पक्षातील नेत्यांनी षडयंत्र रचून माझे घरावर हल्ला करावयास लावून माझे सह माळशिरस तालुका अध्यक्ष सतीश पालकर, युवक तालुका उपाध्यक्ष मयुर माने यांचेवर खोट्या केसेस केल्या.
यावर कहर म्हणजे श्री. सुशिलकुमार शिंदे व श्री. बाळासाहेब थोरात यांचेच कार्यक्रमाला अकलूज येथे येऊन यांनी त्यांचीच वाहवा केली पण श्री. सुशीलकुमार शिंदे व श्री. बाळासाहेब थोरात यांनी अकलूजला येऊनही आमची साधी विचारपूसही केली नाही. वास्तविक तुम्ही व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणी मा. श्री. मोहनदादा जोशी सोडले तर काँग्रेस पक्षातील कोणीही आमची साधी विचारपूसही केली नाही.
आदरणीय काँग्रेसचे जेष्ठ नेते मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार व मा. राज्यपाल मा. श्री. सुशिलकुमारजी शिंदे साहेब व सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी जाहिरपणे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठींबा दिला, त्याच उमेदवाराचे डिपॉझीट जप्त झाले. या पाठींब्यामुळे आघाडीतील मित्रपक्ष उबाठा शिवसेना यांचे कार्यकर्त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नाराजी झाली व काँग्रेस पक्षाने धोका दिला, असा प्रचार व प्रसार निवडणुकीच्या काळामध्ये झाल्याने उबाठा शिवसेना गटातील नेते, कार्यकर्ते व उबाठा शिवसेना यांना मानणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज होऊन आक्रोश व्यक्त करीत होते. याचबरोबर सांगोला तालुक्यात उबाठा शिवसेनेचे उमेदवार दिपक सांळुखे पाटील यांच्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार रामहरी रूपनवर यांनीही उघडपणे अपक्ष उमेदवार बाबासाहेब देशमुख यांचा प्रचार केला व आ. बाबासाहेब देशमुख यांनी भाजपला पाठींबा दिला. येथेही आघाडी धर्म पाळला नाही, याचाही परिणाम काँग्रेसच्या पडणाऱ्या मतावर झाला. यांनी उघड उघड विरोधात प्रचार करूनही यांच्यावरही कारवाई केली नाही. याचे परीणाम काँग्रेसच्या तिन्हीही उमेदवारांना मते मिळाली नाहीत. परीणामी काँग्रेसचे सर्व उमेदवार पडले.
आज काँग्रेस पक्षाचा आदेश पाळायचा की, मा. सुशिलकुमार शिंदे साहेब व खा. प्रणितीताई शिंदे यांचा आदेश पाळायचा हा गहण प्रश्न व संभ्रम सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. आज एखाद्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने अशी भुमिका घेतली असती तर त्याची तात्काळ पक्षातुन हकालपट्टी करण्यात आली असती. पण श्री. शिंदे साहेब व खा. प्रणितीताई शिंदे व त्यांचे गटाचे काँग्रेसमधील पदाधिकारी यांना पक्ष आदेश झुगारुन आघाडीचे विरोधात काम केले, मग यांचेवर कारवाई होणार का ? हा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पडला आहे. “म्हातारी मेल्याचे दुखः नाही पण काळ सोकावता कामा नाही” पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई न झालेस पक्षामध्ये शिस्त ठेवणे अवघड होणार आहे.
काँग्रेस पक्ष मोठा की सुशिलकुमार शिंदे व प्रणितीताई शिंदे मोठे ? हा प्रश्न रक्ताचे पाणी करुन पाळणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पडला आहे. काँग्रेस पक्ष देईल तो आदेश मान्य करुन काम करण्याची आमची तयारी आहे पण पक्षापेक्षा व्यक्ती मोठी ही भावना निर्माण झाली तर पक्षामध्ये काम करणे कठीण आहे, आम्ही काम करु शकणार नाही.
जर वरील कारवाई न झाल्यास पक्षामध्ये भविष्यात शिस्त व पक्ष आदेश मोडणारे व कारवाई न झाल्यास पक्ष वाढणार नाही. व्यक्तीनिष्ठ राजकारण फोफावलेस पक्ष संघटनेला धोका निर्माण होईल. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उबाठा गट पक्षामध्ये झाले त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस नसुन शिंदे काँग्रेस झाली आहे, हे वरील दिलेल्या उदाहरणावरुन स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे मा. खा. राहुलजी गांधी यांचेवर प्रेरीत होऊन काँग्रेस पक्षाचा आदेश पाळलेस माझ्यासह प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला शिंदे काँग्रेसकडून त्रास दिला जातो. पक्षाचे काम करीत असताना अडथळा निर्माण केले जात असतात.
तरी भविष्यात होणारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तिकीट वाटपात शिंदे गट अशाच प्रकारे प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय करणार हे चित्र दिसत असल्यामुळे काँग्रेस पक्षासाठी प्रमाणिकपणे झटणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर मी कदापि सहन करु शकत नाही.
म्हणून मी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असून तो मंजुर करावा, हि विनंती.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.