तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत शेरी नं. १ शाळेचे उज्ज्वल यश
चि. मेघराज कमलाकर माने देशमुख धावणे स्पर्धेत प्रथम तर चि. आर्यन मिलिंद माने देशमुख बुध्दिबळ स्पर्धेत तृतीय
वेळापूर (बारामती झटका)
नुकत्याच माळशिरस येथे सोलापूर जिल्हा परिषद व माळशिरस पंचायत समितीच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत वेळापूर केंद्रातील शेरी नं. १ शाळेने दणदणीत यश संपादन केले आहे.
२०० मीटर धावणे प्रकारामध्ये शाळेतील सातवीमधील विद्यार्थी चि. मेघराज कमलाकर माने देशमुख याने तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. त्याची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. बुध्दिबळ स्पर्धेत शाळेचा विद्यार्थी चि. आर्यन मिलिंद माने देशमुख याने लहान गटात तालुकास्तरावर तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच शाळेचा कबड्डीचा संघही तालुक्यात तृतीय क्रमांकाचा विजेता ठरला आहे. सर्व विजयी खेळाडूंचा मा. अमृतराज सूर्यकांतराव माने देशमुख यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. मा. अमृतभैय्यांनी शाळेच्या कबड्डी संघासाठी टीशर्ट व ट्राऊझर्स देऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. शाळेच्या या उज्ज्वल यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक डाॅ. प्रेमनाथ रामदासी, क्रीडा शिक्षक श्री. पांडुरंग वाघ सर, श्री. प्रदीप कोरेकर सर व श्रीमती रेशमा खान मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी मा. प्रदीप करडे, विस्तारअधिकारी मा. सुषमा महामुनी, केंद्रप्रमुख मा. बापूराव नाईकनवरे, मा. कमलाकर माने देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. हिम्मतराव माने देशमुख, उपाध्यक्षा मा. रेहाना शेख, आदींनी शाळेचे अभिनंदन केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.