HMPV आजाराची लक्षणे कोविडशी साम्य असून सर्दी, खोकला, ताप अशीच आहेत नागरिकांनी भीती घेऊ नये मात्र, काळजी घ्यावी – डॉक्टर प्रियांका शिंदे.
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील सर्व सन्मानीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार व जनतेस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका शिंदे यांनी विनम्र आवाहन केले आहे की, सद्या सोशल मीडियावर HMPV या विषाणूबाबत बातम्या येत असून आपल्या तालुक्यात सद्या अशा प्रकारचा एक ही रूग्ण नाही. या आजाराची लक्षणे कोविडशी साम्य असून सर्दी, खोकला, ताप अशीच असून सदर विषाणू हा पूर्वीपासून आपल्याकडे असून यासाठी प्रतिबंध उपाय म्हणून कोविडमध्ये जे नियम आपण अवलंबले होते तेच पाळावेत, भिती नको, काळजी घ्यावी.
Human metapneumovirus
(HMPV) हा RNA व्हायरस आहे जो, Pneumoviridae कुटुंबातील आहे. या विषाणूमुळे श्वसन संक्रमण होते, ज्याची लक्षणे सहसा सर्दीसारखी असतात. हा रोग सामान्यतः सौम्य असतो, परंतु यामुळे न्यूमोनियासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. लहान मुले, वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना HMPV विषाणू संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो.
मानवी मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा नवीन विषाणू नाही. याची ओळख २३ वर्षांपूर्वी २००१ मध्ये झाली होती. तथापि काही शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, हा विषाणू किमान १९५८ मध्येही पसरला होता. त्यानंतरही त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही किंवा त्यावर फारसे संशोधनही झाले नाही. HMPV विषाणू खोकला आणि शिंकणे यातूनही पसरतो. याशिवाय हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेही पसरू शकतो. त्याचा प्रभाव तीन ते पाच दिवस राहतो. हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो…
खोकणे आणि शिंकणे याशिवाय, HMPV विषाणू संक्रमित व्यक्तीला हस्तांदोलन, मिठी मारणे आणि चुंबन घेण्याद्वारे देखील पसरतो. यासोबतच एखाद्या संक्रमित व्यक्तीने दरवाजाच्या हँडल, कीबोर्ड किंवा खेळण्यांना हात लावला तरीही संसर्ग पसरू शकतो. HMPV विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये खोकला, ताप, सर्दी, घसा खवखवणे, अस्वस्थता आणि श्वास घेण्यात अडचण यासारखी लक्षणे दिसतात..
👉🏻HMPV चे माळशिरस तालुक्यात रुग्ण आढळलेत का ? -सद्या एक ही रूग्ण तालुक्यात नाही
👉🏻HMPV साठी तालुका आरोग्य प्रशासनाने कोणती खबरदारी घेतली आहे. – यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र यांना सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्णांची माहिती घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून जिल्हा स्तरावरून आज सर्व वैद्यकीय अधिकारी यांची vc घेण्यात आली आहे.
👉🏻त्यासाठी प्रतिबंधात्मक कोणते उपाय सुरू केले आहेत ? – सर्वांनी याबाबत अलर्ट राहवे.
👉🏻HMPV बाबत तालुक्यातील नागरिकांना कोणते मार्गदर्शन व आवाहन कराल ? – सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास असे काही लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या दवाखान्यात जायचे आहे, बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ धुवायचे आहेत, गरजेचे नसलेले संपर्क टाळायचे आहेत, मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीत जायचे टाळावे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.