अभिजीत जाधव यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

मळोली (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी संस्था मर्यादित बाळे, जि. सोलापूर, यांच्यावतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मळोली (ता. माळशिरस) येथील सहशिक्षक अभिजीत श्रीमंत जाधव यांना प्रदान करण्यात आला.
हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन राजेंद्र माळी होते. यावेळी व्हाईस चेअरमन विद्या पाटील, संचालक तात्यासाहेब काटकर, सचिव चंद्रकांत भोसले आदी उपस्थित होते.
अभिजीत जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले असून, गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळवून दिले आहे. तसेच प्रशालेतील विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला आहे. अशा अनेक कामामुळे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
प्रगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य रणजितसिंह जाधव, सरपंच अर्चना जाधव, चेअरमन सत्यजित जाधव, मुख्याध्यापक लवटे टी. आर., पर्यवेक्षक पानसरे ए. एस., शिक्षक व ग्रामस्थांनी त्यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.