अंकोली येथील गणेश घाडगे याची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड…

अंकोली (बारामती झटका) (दशरथ रणदिवे यांजकडून)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक या पदावर अंकोलीचे सुपुत्र गणेश सज्जन घाडगे या युवकाची नुकतीच निवड झाली आहे. सन २०२३ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील गणेश सज्जन घाडगे याने हे यश मिळविले आहे.
गणेश घाडगे याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा अंकोली, माध्यमिक शिक्षण भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंकोली, उच्च शिक्षण राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर या ठिकाणी झाले आहे. रणदिवेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक सज्जन शंकर घाडगे यांचा तो मुलगा आहे. या पूर्वी सज्जन घाडगे यांची मुलगी स्नेहल घाडगे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महसूल मंत्रालय सहाय्यक या पदावर नुकतीच निवड झाली आहे.
अत्यंत मेहनत घेऊन अभ्यास आणि कष्टाच्या जोरावर गणेश घाडगे याने स्पर्धा परीक्षेत हे यश मिळविले आहे. अंकोली पंचक्रोशीतील या तरुण युवकाने मिळविलेल्या या यशाबद्दल परिसरातून मोठे कौतुक केले जात आहे. त्याला हे यश मिळविण्यासाठी परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.