महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सातारा जिल्ह्यातील फलटण शहराचा दौरा जाहीर

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार मा. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नियोजनात विविध विकासकामांचा व लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न होणार..
फलटण (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा दि. २६/१०/२०२५ रोजी चा सातारा जिल्ह्यातील फलटण शहराचा दौरा जाहीर झाला आहे. तसेच यावेळी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार मा. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नियोजनात विविध विकासकामांचा व लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने बारामती, जि. पुणेकडे प्रयाण करणार आहेत. त्यानंतर मोटारीने यशवंतराव चव्हाण हायस्कूल, फलटण, जि. साताराकडे आगमन करून फलटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर मोटारीने बारामती विमानतळावर प्रयाण करून विमानाने मुंबईला परत येणार आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



