स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने शिक्षण मंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

अंकोली (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून
एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिक्षकांच्या विविध मागण्याचे निवेदन प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब अडसूळ यांच्या एका शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले.
यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे O.S.D आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे राज्याचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई मंत्रालय येथे सर्व शिष्टमंडळासहित एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष तथा पुणे बोर्ड सदस्य प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ यांचा समावेश होता.
सदर निवेदनामध्ये टप्पा वाढ, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांना विमा संरक्षण मिळावे, शिक्षकांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवाव्यात यासाठी कठोर भूमिका घ्यावी, जिल्हा परिषद माध्यमिक सोलापूर येथे इतर सुविधा व कर्मचारी देणे बाबतच्या मागण्या सदर निवेदनामध्ये शिष्टमंडळाच्या माध्यमातून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना देण्यात आल्या. यावेळी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने ५ मे २०२५ रोजी हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे राज्यस्तरीय संस्थाचालक मेळावा व पुरस्कार वितरण समारंभासाठी शिक्षण मंत्र्याला निमंत्रित करण्यात आले. प्रसंगी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.