ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरसचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष वाघमोडे यांचे अपघाती दुःखद निधन…

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस ग्रामपंचायतीचे माजी सदस्य माळशिरस प्रशाला माळशिरसचे संचालक व भारतीय जनता पार्टीचे माळशिरस शहराध्यक्ष संतोष गंगाराम वाघमोडे, 60 फाटा, माळशिरस यांचे वयाच्या चाळीसाव्या वर्षी सोमवार दि. 21/04/2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता अपघाती दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

संतोष वाघमोडे नातेपुते येथून माळशिरस कडे येत असताना मधुर मिलन मंगल कार्यालयाच्या शेजारील वळणांमध्ये अपघात झालेला आहे. मोटरसायकल पुढील मडगार्ड वाकडी होऊन गाडी पडलेली होती. डोक्याला जबर मार लागलेला होता. रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. सदरच्या अपघातात अज्ञात वाहन कोणते होते, त्याचा तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे हे अपघातावेळीचे सिसि कॅमेरा चेक करून करत आहेत. माळशिरस ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्याकरता आणलेले आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर 60 फाटा माळशिरस येथील शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

वाघमोडे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्वर्गीय संतोष वाघमोडे यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button