आरोग्यताज्या बातम्यासामाजिक

प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोची येथे असंसर्गिक रोग कार्यक्रमांतर्गत कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन मार्फत कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न

मोरोची (बारामती झटका)

आज दि. 21 एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाच्या असंसर्गिक रोग कार्यक्रमांतर्गत कॅन्सर डायक्नोस्टिक व्हॅन मार्फत कॅन्सर तपासणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोची येथे आयोजित केले होते. त्यासाठी सर्व सोयींनी युक्त अशी व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्याने स्त्रियांमध्ये असलेल्या स्तनाचा कर्करोग व योनी मार्गाचा कर्करोग तसेच मौखिक कर्करोग तपासणी जिल्हास्तरावरून आलेल्या तज्ञामार्फत निदान करून रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच ज्या लोकांना पुढील तपासणी व औषध उपचाराची गरज असलेल्या लोकांना संदर्भित करण्यात आले. यावेळी माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर किशोर घाडगे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग सोलापूर डॉक्टर प्रियांका शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी माळशिरस, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एम. पी. मोरे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय नातेपुते डॉक्टर संतोष खडतरे, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉक्टर रोहन वायचळ, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीमती वैशाली थोरात, आय. पी. एच. एस. समन्वयक श्रीमती शोभा माने, स्वप्नपरी जिल्हा सल्लागार डॉक्टर दळवी, एनसीडी जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉक्टर सातपुते, पी. एस. सी. समन्वयक डॉक्टर गार्दी यांचे उपस्थितीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवानी लाड व प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोची येथील सर्व कर्मचारी व आशा यांनी सदर कार्यक्रम चांगल्या नियोजनाखाली पार पाडला.

माळशिरस तालुक्यात पाच दिवस चालणार संसर्गिक रोग कार्यक्रमांतर्गत कॅन्सर डायग्नोस्टिक रुग्णांची तपासणी दि. 21 एप्रिल ते दि. 25 एप्रिल पर्यंत असणार आहे. जिल्हास्तरावरून आलेल्या तज्ञ डॉक्टर मार्फत महाराष्ट्र शासनामार्फत पुरवलेल्या सर्व सोयींनी युक्त असलेल्या व्हॅन मार्फत कर्करोग तपासणी करण्यात येणार असून निदान झालेल्या रुग्णांना पुढील तपासणी व औषध उपचार यासाठी संदर्भित करण्यात येणार असल्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रियांका शिंदे यांनी सांगितले असून तपासणी करून घेण्याबाबत जनतेला आव्हान करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button