अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता लक्ष्मण डाके सेवानिवृत्त, प्रभारी उप अभियंता पदाचा श्री. गोविंद कर्णवर पाटील यांच्याकडे पदभार…

अकलूज (बारामती झटका)
अकलूज सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक १ उप अभियंता श्री. लक्ष्मण डाके दि. 31/05/2025 रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या उप अभियंता पदाचा पदभार शाखा अभियंता श्री. गोविंद कर्णवर पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापूर अधीक्षक अभियंता श्री. संजय माळी यांनी कार्यालयीन आदेश देऊन दिला आहे.
शाखा अभियंता श्री. गोविंद मल्हारी कर्णवर पाटील यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरडवाडी, माध्यमिक शिक्षण गीताई प्रशाला मोटे वस्ती भांबुर्डी, उच्च माध्यमिक शिक्षण गोपाळराव देव प्रशाला माळशिरस, पदविका शिक्षण पॉलिटेक्निक कॉलेज बार्शी, पदवीचे शिक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथून झाले आहे.

त्यानंतर श्रीराम इन्स्टिट्यूट पाणीव या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहिले. 2013 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मध्ये भरती होऊन राष्ट्रीय महामार्ग उपविभाग तुळजापूर या ठिकाणी कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले. नंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग परांडा या ठिकाणी सेवा केली. परंडा इथून बदली होऊन सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज या ठिकाणी ते कार्यरत आहेत. अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागात त्यांना उत्कृष्ट शाखा अभियंता पुरस्कार देखील मिळाला आहे.
सध्या गोविंद कर्णवर पाटील यांच्याकडे शाखा अभियंता पदाचा पदभार असून प्रभारी उप अभियंता पदाचा पदभार राहणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



