पुणे विभागीय आयुक्त कार्यालय विधानभवन येथे पुणे, सातारा, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांतील पालखी सोहळ्याची नियोजन आढावा बैठक संपन्न

पुणे (बारामती झटका)
आषाढी एकादशी पालखी सोहळा २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज पुणे विभागीय आयुक्त कार्यालय विधानभवन येथे पुणे, सातारा, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांतील पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, माझे खाजगी सचिव सुनील कोठेकर, विभागीय आयुक्त शितल तेली- उगले, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सोलापूर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, अपर आयुक्त, सामान्य प्रशासन तुषार ठोंबरे आदी उपस्थित होते.
आगामी आषाढी वारीमध्ये पालखीतील एकाही वारकऱ्याला असुविधा होता कामा नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आहेत; त्यानुसार सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळा सर्वोत्कृष्ट पद्धतीने कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन सर्व अधिकाऱ्यांना केले.

आषाढीवारीदरम्यान पाणी, शौचालये, स्वच्छता, आरोग्य सुविधा, मुक्कामाची चांगली व्यवस्था आदींची चोख व्यवस्था ठेवावी असे सांगून ग्रामविकास विभागाने पालखी सोहळ्यासाठी पहिल्यांदाच गतवर्षीपासून निधीची तरतूद ठेवण्यास सुरूवात केली. यावर्षी पालखीसाठी ७६ कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आवश्यकतेप्रमाणे सोयी सुविधा निर्माण करण्यात येत असून त्या दर्जेदार होतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, पालखी सोहळ्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी शौचालयांचा वापर होईल अशा ठिकाणी शौचालये ठेवावीत. तेथे पाण्याची उपलब्धता व सतत स्वच्छता होईल यासह शौचालयांच्या मार्गावर चिखल होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी त्या ठिकाणी काँक्रेटीकरण करण्याची कार्यवाही करावी. यावर्षी शौचालयांचे अतिरिक्त संच ठेवण्यात आल्याने किमान ३६ ते ४८ तास अगोदर ते पालखीच्या पुढील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेल याची काळजी घ्यावी. पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जर्मन हँगर, जलरोधक मंडप आदी व्यवस्था करण्यात आली आहे. असून वारकऱ्यांची निवाऱ्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे होईल, असा विश्वास व्यक्त केला.
पालखीमार्गाला जोडणारे ग्रामीण भागातील रस्ते, मार्गापासून पालखीतळाकडे जाणारे रस्त्यांची तात्पुरती दुरूस्ती न करता कायमस्वरुपी टिकतील असे सिमेंटचे रस्ते करावेत. वारंवार रस्त्यांची दुरुस्ती करावी लागू नये यासाठी सिमेंट रस्ते करण्याबाबत प्रस्ताव पाठवावेत जेणेकरुन पुढील वर्षीच्या पालखीपूर्वी असे रस्ते तयार होतील, आदी सूचनाही यावेळी दिल्या.

गतवर्षी पालखीसोहळ्यात उत्कृष्ट काम केलेले मात्र आता बदली झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा पालखी कालावधीदरम्यान उपलब्ध करून घ्याव्यात. आषाढी अगोदर व नंतर ८ दिवस व्हीआयपी दर्शन बंद करावे. सोलापूर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राज्यातील इतर विभागातून येणाऱ्या पालख्या व दिंड्यांसाठी आवश्यक सुविधांचा आढावा घेऊन नियोजन करावे अशा सूचना दिल्या.
यावेळी उपस्थित असलेल्या पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडून तेथील सुविधांची व सुरू असलेल्या तयारीची माहिती घेतली. पंढरपूर येथील रस्त्यांचे कारपेट करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करून ८ दिवसांपूर्वीपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती करावी. पालखीदरम्यान स्वच्छतेसाठी १ महिना अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात येत असून नगरपरिषदेच्या मनुष्यबळासह हे स्वच्छतेचे काम करणार आहे. स्वच्छतेबाबत काटेकोर दक्षता घ्यावी. भाविकांच्या मार्गदर्शनासाठी चांगल्या प्रकारचे दिशादर्शक फलक लावावेत. चंद्रभागा नदीत स्नान करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक तेव्हढ्या बोटी ठेवाव्यात, अशा सूचना यावेळी दिल्या.
दरवर्षी आषाढीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढत असून यावर्षी ३० लाख विठ्ठलभक्त दर्शनासाठी येऊ शकतील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने सर्व मनुष्यबळाने समन्वयाने काम करावे. पालखीच्या अनुषंगाने दोन्ही पालखी मार्गाची, विसावे, पालखी मुक्कामाच्या ठिकाणांची पाहणी केली असून त्याबाबत आढावा घेतला आहे. पालखीच्या सुविधा व मूलभूत सुविधांच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक त्या सुधारणा होत असल्याबाबत आढावा घेण्यात येत असल्याचेही सांगितले.
पालखी सोहळ्यादरम्यान पुणे जिल्ह्यात ३४३ ठिकाणी २८ हजार ५००, सातारा ८ हजार व सोलापूर जिल्ह्यात २११ ठिकाणी २९ हजार ५१० शौचलयांची उभारणी करण्यात येणार आहे. पुणे- २८, सातारा ७ व सोलापूर जिल्ह्यात २३ जर्मन हँगर, सर्व पालखी मार्गावर २२० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पालखीसाठी आरोग्य विभागाचे ५ हजार ६९८ इतके मनुष्यबळ कार्यरत असणार आहे. दिंडीप्रमुखांना एकूण १० हजार औषधांचे किट वाटप करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तिन्ही जिल्ह्यात २१ हजार ८२० इतके पोलीस अधिकारी, कर्मचारी मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे. एकूण सर्व विभागांचे मिळून ५२ हजार ७०६ मनुष्यबळाची नेमणूक करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
आषाढी वारीदरम्यान पंढरपूर येथे अत्यंत अत्याधुनिक पद्धतीचे कनेक्शन जिओ नेटवर्कडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे मोबाइलद्वारे संपर्क व्यवस्था विस्कळीत होणार नाही.पालखी सोहळ्यासाठी तिन्ही जिल्ह्यात पंढरपूर येथे आषाढीवारीसाठी १० पालख्या येत असतात. या पालख्यांची ३८ मुक्कामाची ठिकाणे व ४३ विसावे असून ७ रिंगण होतात. पालखी सोहळ्यासाठी २३ जर्मन हँगर व ३७ जलरोधक मंडपांची व्यवस्था करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. पाणीपुरवठ्यासाठी २२० टँकर, ५०० स्नानगृहे, ५ हजार शौचालयांची व्यवस्था, १५ मोबाईल चार्जिंग व्हॅन, ४० ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात येणार आहेत. मेडिसीन ऑन व्हील, बाईक ॲम्ब्युलन्स, हिरकणी कक्ष आदी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे सातारा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन,सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त चैतन्य लोंढे (कबीरबुवा), विश्वस्त तथा पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह मोरे, श्री संत सोपानदेव देवस्थानचे मुख्य विश्वस्त त्रिगुण गोपाल गोसावी, श्री संत निळोबाराय संस्थानचे विश्वस्त अशोकराव सावंत, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आदी बैठकीस उपस्थित होते. विधानभवन येथे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख उमेश महाराज मोरे, यांच्यासह पाटबंधारे विभाग, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड मनपा, पोलीस विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आरोग्य विभाग, भारतीय रेल्वे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, भारत संचार निगम लि., अन्न व औषध प्रशासन, महामेट्रो, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
- June 2026
- May 2026
- April 2026
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- October 2022
- September 2022
- August 2022
- July 2022
- January 2022



