चाकोरे गावचे धाडसी नेतृत्व सुरेश पाटील उर्फ आबासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले…

चाकोरे गावच्या इतिहासात प्रथमच रेकॉर्ड ब्रेक रक्तदान
चाकोरे (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात सुप्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व चाकोरे गावचे धाडसी नेतृत्व सुरेश पाटील उर्फ आबासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. ४ सप्टेंबर २०२३ रोजी चाकोरे येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले आहे. चाकोरे गावच्या इतिहासात प्रथमच रेकॉर्ड ब्रेक रक्तदान करण्याचा विक्रम चाकोरे गावातील युवा कार्यकर्ते रावण साम्राज्य ग्रुप व संपूर्ण पाटील परिवार यांनी परिश्रम घेऊन 123 रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदविलेला आहे.
चाकोरे गावामध्ये सुरेश पाटील ऊर्फ आबासाहेब यांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. ते गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला कायम सहकार्य करीत असतात. त्यांचा अन्यायाच्या विरोधात कायम संघर्ष असतो. सुसंस्कृत घराण्यामध्ये जन्म झालेले आबासाहेबांचा सर्वच क्षेत्रामधील जनतेशी कायम सुसंवाद व संपर्क असतो.


यावेळी अनेक युवकांनी स्वयंस्फूर्तीने येऊन रक्तदान केलेले आहे. आबासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम आज मंगळवार दि. ५ सप्टेंबर २०२३ रोजी ११ वाजता होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng