आव्हे येथील तुकाराम जगताप यांचे वृद्धापकाळाने निधन…

पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
पंढरपूर तालुक्यातील आव्हे येथील तुकाराम दाजी जगताप यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक जावई, तीन मुले नातवंडे, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार रघुनाथ देवकर यांचे सासरे होत.
ते बापू या नावाने सर्वपरिचित होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच पंढरपूर, आटपाडी, सांगोला, माळशिरस तालुक्यातील आप्तस्वकीय, पाहुणेरावळे, सगेसोयरे सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यदर्शनासाठी बहुगर्दी केली.
सर्व उपस्थितांनी अंत्यदर्शन घेतले व त्यांच्या मनमिळावू स्वभावाचे सर्वांनी कौतुक करून तरुणाईमध्ये त्यांनी पैलवानकीचा शौक जोपासला होता. सोबतच भजन आणि कीर्तनाचा त्यांना छंद असल्याचे बोलून दाखवले. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचेही सांगितले.

स्व. तुकाराम जगताप यांच्या परिवाराला दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्वर्गीय तुकाराम जगताप यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



