दानशूर सरपंच सौ. स्वाती खटके यांचे सरपंच मानधन मधून 51 हजार रुपयांचे अतिवृष्टी व पूर परिस्थितींना आर्थिक सहकार्य.

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 51 हजार रुपयाचा चेक अदा केला..
जांभूड (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे जनजीवन विस्कळीत झालेले होते. अनेक लोकांची घरेदारे शेती वाहून गेलेली आहे. अडचणीत असलेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीने बाधित झालेल्या लोकांना माळशिरस तालुक्यातील जांभूड गावच्या दानशूर सरपंच सौ. स्वाती राहुल खटके यांनी सरपंच मानधनातून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 51 हजार रुपयाचा धनादेश अदा केलेला आहे.
अडचणीत असलेल्या शेतकरी व सर्व सामान्य जनतेला मदत करून त्यांच्या अडचणीमध्ये सरपंच सहभागी झालेल्या आहेत. परिस्थिती कशीही असो अडचणीतील माणसाला मदत व सहकार्य करण्याची दानत असावी लागते. हीच दानत सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या स्वातीताई यांनी दाखवून दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्या पत्रामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता अनुदानासाठी सरपंच मानधनामधून निधी जमा करत आहे. चालू वर्षात सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने तसेच भीमा व सिना नदीला पूर आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेती, घरे, जनावरे वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करणे अत्यंत गरजेचे असून मी स्वाती राहुल खटके सरपंच ग्रामपंचायत जांभूड, ता. माळशिरस, जि. सोलापूर मला शासनाकडून मिळणाऱ्या सरपंच मानधनामधून रू. 51 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता अनुदानासाठी जमा करीत आहे. तरी रक्कम स्वीकारणे असे पत्र देऊन सदरच्या पत्रासोबत धनादेश दिलेला आहे.
माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागामध्ये पाणीदार माजी आमदार बबनदादा शिंदे व युवा नेते रणजीतभैया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जांभूड विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन युवानेते राहुल खटके यांच्या नेतृत्वाखाली सौ. स्वाती राहुल खटके यांनी जांभूड ग्रामपंचायतीचा लोकाभिमुख प्रशासन चालवून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला शासनाच्या योजना पोहोचवण्याचे काम केलेले आहे. कार्यातून आदर्श असणाऱ्या सरपंच स्वतःचे मानधन देऊन दानशूर सरपंचामध्ये गणना केली जात आहे. स्वातीताई यांच्या अडचणीतील जनतेला व शेतकऱ्यांना मदत करण्याच्या आदर्श उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

सदरचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करताना ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते, भाजपचे प्रांतिक सदस्य राजकुमार नाना पाटील, भाजपचे सोलापूर ग्रामीण अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य युवा नेते रणजीतभैय्या शिंदे आदी उपस्थित होते. युवा नेते राहुलजी खटके यांनी धनादेश व ग्रामपंचायतीचे पत्र मुख्यमंत्री यांच्या स्वाधीन केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



