उत्तमराव जानकर म्हणजे ! गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा चित्रपटातील “नारायण वाघ” – नागेश वाघमोडे

जानकर म्हणजे खुर्चीसाठी देवाला गंडवणारे पात्र
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तम जानकर हे सध्या कुणालाही न शोभणारे विधान करण्यामध्ये व्यस्त आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना केबिनमध्ये कोंडतो, सिओ चे दार मोडून निधी आणतो. कलेक्टरचे दार मोडतो अन् निधी आणतो! अशी अशोभनीय विधान करून स्वतः जास्त हिम्मतवाल असण्याचा कांगावा करीत आहेत. परंतु, दुसऱ्याची दारं मोडून स्वतःचे घरं भरण्याची परंपरा जानकरांनी कायम ठेवली आहे.
आमदार होण्यासाठी उत्तमराव जानकर यांनी आपली विचारधारा विकली. जानकर यांचा आमदार होण्याचा प्रवास हा प्रसिद्ध चित्रपट “गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा” मधील नारायण वाघ या पात्रासारखा आहे. स्वतः आमदार होण्यासाठी जानकर यांनी अनेक समाज नेत्यांचा बळी दिला व खोट्या शपथा घेऊन राजकारणात त्यांनी देवालाही गंडवण्याचं पात्र हे उत्तम जानकर आहेत. तर प्रस्थापितांच्या विरोधात उभा केलेला मोठा लढा सोडून खुर्चीसाठी जानकर यांनी आपल्या समाजाचा बाजार मांडला आहे. त्याचबरोबर जानकर यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज काढून जानकरांनी स्वतःच राजकारण उभा केलं, हे संपूर्ण तालुका जाणतो.
दुसऱ्यांवर टीका करून स्वतःचं राजकारण उभा राहत नसतं, हे जानकरांना माहीत असून देखील, असभ्य भाषा वापरून कायम चर्चेत राहण्याचा हा जानकरांचा जुना धंदा आहे. ज्यांच्या विरोधात लढण्यामध्ये विरोधकांची हयात गेली. त्या विरोधकांनी जानकर यांना नेता केलं शेवटी ते सर्वांच्या पाठीत खंजीर खुपसून प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावून बसले व जात बदलून आमदार झाले. त्यामुळे खुर्चीसाठी वाटेल ते करण्याची जानकर यांनी तयारी आजवर ठेवली आहे. त्यामुळे विचारधारा नसलेला नेता म्हणजे उत्तमराव जानकर आहेत.
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधील नारायण वाघ हे पात्र आणि माळशिरसचे विद्यमान आमदार उत्तम जानकर हे पात्र अतिशय मिळतं जुळतं आहे. हे मत नागेश वाघमोडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



