ताज्या बातम्याराजकारण

पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी वात पेटवली; सोलापुरातील आणखी एक पवार समर्थक माजी आमदार भाजपच्या वाटेवर…

सोलापूर (बारामती झटका) (सरकारनामा साभार)

ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी सोलापूरमधील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळवण्याचा विडा उचलला आहे. चार माजी आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली असून दीपक साळुंखेही भाजपच्या वाटेवर आहेत.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याचा निर्धार केला असून, त्यांच्या प्रयत्नांतून चार माजी आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. ना. गोरे यांनी सांगोला येथील माजी आमदार दीपक साळुंखे यांची भेट घेऊन त्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दीपक साळुंखे हे पूर्वी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष असून, नंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून निवडणूक लढवली होती; आता ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत.

ना. पालकमत्रा जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला भूईसपाट करण्याचा विडा उचलल्याचे दिसून आले. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन, तर काँग्रेसच्या एका, अशा चार माजी आमदारांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. त्यासाठी गोरे यांनी सूत्रे हलविल्याचे दिसून आले. या चार माजी आमदारानंतर जयकुमार गोरे यांनी पवार समर्थक सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांची भेट घेतली असून तेही भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या सांगोल्यातील कार्यालयास सदिच्छा भेट दिली आहे. त्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गोरे यांनी माध्यमांशी बोलताना माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत, त्यामुळे सोलापूरात भाजपच्या टार्गेटवर राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गोरे यांनी माध्यमांशी बोलताना माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत, त्यामुळे सोलापुरात भाजपच्या टार्गेटवर राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे दिसून येत आहे.

दीपक साळुंखे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे यांच्या भांडणात शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख निवडून आले.

विधानसभा निवडणुकीनंतर शांत असलेले दीपक साळुंखे यांचा कल भाजप प्रवेशाकडे असल्याची चर्चा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापासून चार हात लांब राहिल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून ते महायुतीच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दिसून येत होते, त्यामुळे साळुंखे हे भाजपमध्ये जाणार का, अशीही चर्चा रंगली होती.

पालकमंत्री गोरे यांनी दीपक साळुंखे यांच्या सांगोल्यातील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्या भेटीत दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना गोरे यांनी दीपक साळुंखे यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश किती तारखेला होणार, याची उत्सुकता सांगोल्याच्या राजकीय वर्तुळाला लागली आहे.

साळुंखे कुटुंबीयांसमेवत पालकमंत्र्यांची बंद खोलीत चर्चा
माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या कुटुंबातील सदस्यांसमेवत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बंद खोलीत चर्चा केली आहे. या वेळी दीपक साळुंखे, त्यांची बहीण जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड, साळुंखे यांचे सुपुत्र व इतर सदस्य उपस्थित होते. त्यामुळे सांगोल्याचे नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Q1: जयकुमार गोरे यांनी कोणत्या पक्षाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे ?
A1: त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला भूईसपाट करण्याचा विडा उचलला आहे.

Q2: माजी आमदार दीपक साळुंखे कोणत्या पक्षात जाण्याची शक्यता आहे?
A2: दीपक साळुंखे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे.

Q3: दीपक साळुंखे यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे?
A3: ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते आणि नंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून लढले होते.

Q4: जयकुमार गोरे यांनी दीपक साळुंखे यांना कुठे भेट दिली ?
A4: त्यांनी सांगोला येथील साळुंखे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom