भारतीय जनता पार्टीकडून पिलीव गटातून मराठा समाजाला चंद्रकांत जाधव यांची जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर……

पालकमंत्री जयकुमार गोरे, मा. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, मा. आ. राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात मराठा समाजाला न्याय दिला…..
मळोली (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार ठरविण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात मराठा समाजाला न्याय दिलेला आहे. भारतीय जनता पार्टीकडून मराठा समाजाचे चंद्रकांत ज्ञानोबा जाधव यांना पिलीव जिल्हा परिषद गटातून तालुक्यात पहिली उमेदवारी जाहीर केलेली असल्याने माळशिरस तालुक्याच्या पूर्वभागासह तालुक्यामध्ये मराठा समाजात भारतीय जनता पार्टीविषयी आत्मीयता निर्माण झालेली आहे.

माजी आमदार राम सातपुते यांच्या विकासकामांवर प्रेरित होऊन माळशिरस तालुक्यामध्ये दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व जाती धर्मातील लोकांचा वाढता आलेख आहे. भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहते हे सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील चंद्रकांत जाधव यांना जिल्हा परिषदेची पहिली उमेदवारी जाहीर करून कार्यकर्त्यांची कदर करणारा पक्ष अशी भावना जिल्हा परिषद गटामधून झालेली आहे. चंद्रकांत जाधव शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी मळोली गावचे उपसरपंच पद भूषविलेले आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन समाजकारण व राजकारण चंद्रकांत जाधव यांचे सुरू असते. सकाळी सात वाजल्यापासून रात्री कितीही वाजले तरी वेळेकडे न पाहता सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या कामासाठी वेळ देणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.

चंद्रकांत जाधव यांच्या घरात राजकीय परिस्थिती नाही. मात्र, त्यांनी आपल्या कार्यातून समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. माजी आमदार राम सातपुते यांच्यासोबत काम करून सर्वसामान्य गोरगरीब व दिनदलित लोकांची अनेक कामे केलेली आहेत.

माजी आमदार राम सातपुते यांनी चंद्रकांत जाधव यांच्यातील कार्यकर्ता ओळखून जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर केलेली आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य व काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय दिला जातो. सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील मराठा तरुणाची भाजपकडून उमेदवारी जाहीर केलेली असल्याने मराठा समाजासह इतर जाती धर्मातील लोकांना कार्यकर्त्याची कदर केलेली असल्याने समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी पिलीव जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत ज्ञानोबा जाधव यांच्याकडे एबी फॉर्म दिलेला आहे. पिलीव जिल्हा परिषद गटातील सर्व जाती धर्मातील नेते व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन माळशिरस तालुक्यातील पहिला जिल्हा परिषद मराठा समाजाचा उमेदवार जाहीर केलेला असल्याने भाजपकडून मराठा समाजाला न्याय दिलेला असल्याची भावना मराठा समाजामध्ये झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



