रणजीतसिंह नाईक निंबाळकर माढा लोकसभेचे पाणीदार खासदार नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे खरे भगीरथ ठरले….

कृष्णा नीरा भीमा फ्लड डायव्हर्शन महत्वाकांक्षी पूर पाणी वळवण योजनेच्या सर्वेक्षणासाठी २४ कोटी ५ लाख ६७ हजार १५ रुपयाच्या निधीला प्रशासकीय मान्यता….
माळशिरस (बारामती झटका)
पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांमधून पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील तीव्र दुष्काळी भागाकडे वळवणाऱ्या अत्यंत महत्त्वाकांक्षी पूर पाणी वळवण योजनेच्या (फ्लड डायव्हर्जन) सविस्तर सर्वेक्षणासाठी राज्य शासनाने २४ कोटी ५ लाख ६७ हजार १५ रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिलेली असल्याने रणजीतसिंह नाईक निंबाळकर माढा लोकसभेचे पाणीदार खासदार नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र सह मराठवाड्यांच्या शेतकऱ्यांचे खरे भगीरथ ठरले आहेत..

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने अति तात्काळ बैठक क्रमांक 0123/प्र.क्र. 24 /23 मोप्र-1 दि. 16/03/2023 पत्रान्वये तत्कालीन उपमुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि. 31/01/2023 रोजी सकाळी 10 वाजता समिती कक्ष क्रमांक 05 मंत्रालय येथे माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित जलसिंचन व इतर प्रकल्पा संदर्भात बैठक संपन्न झालेली होती. सदरच्या बैठकीस माढा लोकसभेचे कार्यकर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सांगोला विधानसभा आमदार शहाजीबापू पाटील, माण खटाव विधानसभा आमदार जयकुमार गोरे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी, जलसंपदा विभाग अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभाग मंत्रालय अप्पर मुख्य सचिव मनोज सैनिक, नियोजन विभाग प्रधान सचिव राजगोपाल देवरा, ऊर्जा विभाग प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला, विदेव न्याय विभाग प्रधान सचिव मिरज धोटे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यकारी संचालक अतुल अकोले, जलसंपदा मुख्य अभियंता (जस) ह. वि. गुणाले, जलसंपदा मुख्य अभियंता (विप्र) हे. तू. धुमाळ, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे आदी उपस्थित होते. सदर बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित जलसिंचन व इतर प्रकल्प संदर्भातील चर्चा झाली.
सदर बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय निर्देश दिले
१) नीरा देवधर प्रकल्पाचा सुप्रमा प्रस्ताव शासन स्तरावर प्राप्त असून मंजुरीची प्रक्रियेमध्ये आहे. असे अप्पर मुख्य सचिव जलसंपदा यांनी अवगत केले. सदर कामास सुप्रमा मिळाल्यावर योजनेमध्ये अंतर्भूत असलेली कामे हाती घेण्यात यावेत असे निर्देश माननीय अध्यक्ष यांनी दिले. तसेच सदर प्रकल्पास केंद्र शासनाची मान्यता मिळणेबाबत व प्रकल्पास PMKSY. AIBC अंतर्गत निधी मिळणे बाबत प्रस्ताव दि. 14/06/2022 रोजी केंद्र शासनास सादर केला असून त्यावरील शेरे पूर्तता कार्यवाही सुरू आहे. बंदिस्त नलिका वितरण प्रणाली मुळे पाण्याची बचत होणार आहे. या बचतीच्या पाण्याचा फेर वाटपाबाबत शासन स्तरावर उचित निर्णय घेण्यात येईल..
२) कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प राबविण्यात कायदेशीर अडचणी आहेत. कृष्णा पाणी तंटा लवाद क्रमांक दोन प्रमाणे अंतर खोरे पाणी वापरास निर्बंध आहेत. तसेच याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयात कृष्णा पाणी तंटा लवादा दोन ने अनुषंगाने सुनावणी सुरू असल्याचे देखील अवगत केले. माननीय सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना निर्णय घेतल्यास त्याला इतर राज्य हरकती घेऊ शकतात. दि. 14 मार्च 2023 रोजी सुनावणी आहे. त्यामुळे दरम्यानचे काळात जागतिक बँक ADB समवेत प्रकल्प अहवाल सादर करण्याची कार्यवाही करावी..

३) गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मण रावजी इनामदार उपसा सिंचन जिहे कटापूर योजनेच्या आंधळी बोगद्याचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यावर असून पाच मीटरचे खोदकाम बाकी असून बोगद्याच्या शाफ्ट जवळील शेतकऱ्यांची बोगद्यातून उपसाद्वारे सिंचनासाठी पाणी मिळण्याची मागणी आहे. या मागणी स्थळ शेतकऱ्यांच्या कामाला विरोध आहे. याबाबत कार्यकारी संचालक यांनी माहिती दिली व सदर काम करण्यास सर्वसाधारणपणे एक महिना कालावधी लागेल व त्यानुसार कार्यवाही केली जाईल.. या बैठकीनंतर तत्कालीन पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता..
महाराष्ट्र शासन उपसचिव सविता बोधेकर यांनी दि. 22/07/2026 रोजी कृष्णा खोरे पाणी तंटा लवाद एक मधील पाण्याचा परिपूर्ण वापर करण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीतील मराठवाडा राज्यात अनुज्ञेय उपलब्ध पाणी निरा नदीत वळवून दुष्काळी भागात वापरण्याचे अनुषंगाने कृष्णा नदीवरील सापटेवाडी बंधारा ते नीरा नदीवरील उद्धट बंधारा व निरा नदीवरील उद्धट बंधाराचे उजनी धरण अशा दोन टप्प्यातील आवश्यक सर्वेक्षण या अन्वेषण करून त्यानुसार संकल्पन अंदाजपत्रक व प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कामाला 24,05,67,125 (चोवीस कोटी पाच लक्ष सदुसष्ठ हजार एकशे पंचवीस रुपये) किमतीस अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे असा शासन निर्णय केलेला आहे…
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दुष्काळग्रस्त जनतेला ही मोठी भेट (रिटर्न गिफ्ट) दिले असल्याची माहिती कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पामुळे सातारा, सोलापूर सह मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणारे ५१ टीएमसी पाणी बोगद्याद्वारे दुष्काळी पट्ट्यात वळविता येणार आहे.
कोयना, कृष्णा, कुंबी आणि कासारी या नद्यांमधील अतिरिक्त पाणी दरवर्षी समुद्रात वाहून जाते. हे पाणी शाश्वत पद्धतीने दुष्काळी भागात पोहोचवण्यासाठी सुमारे १७ ते १८ हजार कोटी रुपयांच्या या भव्य प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.

पावसाळ्यातील ९० दिवसाच्या कालावधीत सुमारे ५१ टीएमसी अतिरिक्त पाणी वळवणे या योजनेमुळे शक्य होणार आहे. पाणी वाहून नेण्यासाठी ११० किलोमीटर लांबीच्या भव्य भूगर्भीय बोगद्याचे नियोजन आहे. मंजूर निधीतून या बोगद्याच्या मार्गावरील खडकांची चाचणी, ड्रिलिंग आणि भूगर्भीय तपासणी केली जाईल. एशियन डेव्हलपमेंट बँकेने या सर्वेक्षणासाठी आणि प्रकल्पासाठी अर्थसहाय्य देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. या योजनेअंतर्गत सापतेवाडी ते आसू दरम्यान उभारण्यात येणाऱ्या बोगद्यामुळे बॅक वॉटर निरा गावापर्यंत सुमारे २० ते २५ किलोमीटर पर्यंत पोहोचेल.
या माध्यमातून धोम बलकवडी, नीरा डावा कालवा, मीरा उजवा कालवा आणि नीरा देवघर या सिंचन प्रणालींमध्ये ५ टीएमसी पाणी इंजेक्शन पद्धतीने सोडण्यात येईल. परिणामी, हे महत्त्वाचे कालवे वर्षभर प्रवाही राहण्यास मदत होईल.

तसेच फलटण भागातील बाणगंगा नदी बारमाही प्रवाही ठेवण्यासाठी धोम बलकवडी प्रकल्पाच्या उपळवे येथून अर्धा टीएमसी पाणी सोडण्याची मागणीही करण्यात आली आहे. फलटण मधील बाणगंगा नदी प्रवाही ठेवण्यासाठी धोम बलकवडी प्रकल्पाच्या उपळवे येथून अर्धा टीएमसी पाणी सोडण्याची मागणी त्यांनी केली.
पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा योग्य वापर करून दुष्काळी भागाचे भवितव्य बदलण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. सर्वेक्षणाचे काम जलद गतीने पूर्ण होऊन हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात कायमस्वरूपी समृद्धी येईल. – रणजीतसिंह नाईक निंबाळकर, पाणीदार माजी खासदार तथा दुष्काळी भागाचे भगिरथ

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



