ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

CCTV ने सत्य समोर आणले! उपजिल्हा रुग्णालय फलटणच्या डॉ. राजेंद्र रुपनवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी लवकरच जेरबंद होणार?

“शकुनीच्या सल्ल्याने कटकारस्थान” – दाढीवाल्याची रणनीती, मिशीवाल्यावर आरोप; हातावरील सुसाईड नोटमध्ये माजी मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाचा उल्लेख

फलटण (बारामती झटका)

उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी मुंबई येथे आत्महत्या केल्याच्या घटनेने सातारा व सोलापूर जिल्हा हादरला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस च्या फडतरी गावचे सुपुत्र डॉक्टर राजेंद्र रुपनवर आहे…

प्राथमिक माहितीनुसार, प्रशासनातील काही अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या निकटवर्तीयांनी डॉ. रुपनवर यांना उपजिल्हा रुग्णालयात धक्काबुक्की केल्याचा आणि बनावट प्रमाणपत्रासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. या सततच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे.

हातावरील सुसाईड नोट आणि CCTV महत्त्वाचा पुरावा
आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. रुपनवर यांनी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिल्याचे समोर आले आहे. या नोटमध्ये माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे स्वीय सहाय्यक (OSD) कोंडे पाटील यांच्या नावाचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विशेष म्हणजे, कोंडे पाटील यांच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींची नावे नोटमध्ये नसली तरी, उपजिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांचे चेहरे कैद झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणातील खरे सत्य लवकरच समोर येणार आहे.

“शकुनीचा सल्ला आणि दाढी-मिशीचे राजकारण”
फलटणच्या राजकीय वर्तुळात या घटनेमागे “शकुनीच्या सल्ल्याने कटकारस्थाने रचली जात आहेत, दाढीवाल्याच्या सांगण्यावरून मिशीवाल्यावर सगळं ढकललं जातंय, पण सीसीटीव्हीमुळे सगळं सत्य बाहेर येतंय” अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि सुसाईड नोटच्या आधारे आरोपींना लवकरच जेरबंद केले जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button